…खरंच ही सनी लिओनी आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 17:35 IST2016-05-26T12:05:21+5:302016-05-26T17:35:21+5:30
आपल्या हॉट अदा आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली सनी लिओनीचा हा नवीन लूकपाहून तिचे चाहते आवाक झाले आहेत.

…खरंच ही सनी लिओनी आहे?
सनीने आपल्या हेअरस्टाईल आणि मेकअपमध्ये लक्षवेधी बदल केला असून, तिच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सनीचे चाहते तिच्या नव्या लूकची भरभरून प्रशंसा देखील करत आहेत. सनीने आपल्या नव्या लूकची छबी ट्विट केली असून आपल्या हेअर डिझायनर थॉमस आणि मेकअप मॅन निनाचे आभार व्यक्त केले आहेत.
गुलाबी डाय हेअर स्टाईल आणि त्यास रंगसंगतीला जुळणारा मेकअप सनीने केला आहे. सनीचे हे छायाचित्र पाहून सुरूवातीला ही खरंच सनी आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. काहींनी सनी बार्बी डॉल दिसत असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी ती आणखी तरुण झाल्याचे म्हटले आहे.