या देशात दोन लग्न करणे कायद्याने बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:06 IST2016-02-05T06:36:36+5:302016-02-05T12:06:36+5:30
जगातील प्रत्येक देशात तेथील संस्कृती, परंपरा यांच्या आधारावर कायदे तयार केले जातात. भारतात आणि बहुतांश पाश्चात्य राष्ट्रातही एकापेक्षा जास्त लग्न करण्यास देशातील नागरिकांना परवानगी नाही. दुसरे लग्न करायचे झाल्यास महिलेला अथवा पुरुषाला आपल्या जोडीदारापासून कायदेशीररित्या वेगळे व्हावे लागते. पण, जगात असाही एक देश आहे जिथे प्रत्येक पुरुषाने दोन लग्न करणे कायद्याने बंधनकारक आहे. या देशाचं नाव आहे 'एरीट्रिया'. आफ्रिका खंडातील या देशात प्रत्येक पुरुषाला दोन लग्न करणे अनिवार्य आहे.या देशात आजपर्यंत अनेकदा यादवी युद्धे झाली आहेत. १९९८ ते २००० या काळात झालेल्या यादवी युद्धात १,५०,००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. त्यामुळे येथील पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. या देशातील महिलांना आपल्या अपेक्षेप्रमाणे आयुष्याचा साथीदार मिळणेही कठीण झाले आहे. भविष्यातही असेच काहीतरी होईल, अशी भीती येथील सरकारला वाटते.या देशात दोन लग्न न करणा-या पुरुषाला तुरुंगाची हवा खावी लागते.

या देशात दोन लग्न करणे कायद्याने बंधनकारक
ज ातील प्रत्येक देशात तेथील संस्कृती, परंपरा यांच्या आधारावर कायदे तयार केले जातात. भारतात आणि बहुतांश पाश्चात्य राष्ट्रातही एकापेक्षा जास्त लग्न करण्यास देशातील नागरिकांना परवानगी नाही. दुसरे लग्न करायचे झाल्यास महिलेला अथवा पुरुषाला आपल्या जोडीदारापासून कायदेशीररित्या वेगळे व्हावे लागते. पण, जगात असाही एक देश आहे जिथे प्रत्येक पुरुषाने दोन लग्न करणे कायद्याने बंधनकारक आहे. या देशाचं नाव आहे 'एरीट्रिया'. आफ्रिका खंडातील या देशात प्रत्येक पुरुषाला दोन लग्न करणे अनिवार्य आहे.या देशात आजपर्यंत अनेकदा यादवी युद्धे झाली आहेत. १९९८ ते २००० या काळात झालेल्या यादवी युद्धात १,५०,००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले होते. त्यामुळे येथील पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. या देशातील महिलांना आपल्या अपेक्षेप्रमाणे आयुष्याचा साथीदार मिळणेही कठीण झाले आहे. भविष्यातही असेच काहीतरी होईल, अशी भीती येथील सरकारला वाटते.या देशात दोन लग्न न करणा-या पुरुषाला तुरुंगाची हवा खावी लागते.