​कामाचा कंटाळा घालविणे शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 04:15 IST2016-03-06T11:15:38+5:302016-03-06T04:15:38+5:30

एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, प्रेरित केले असता लोक काम करण्यास उद्युक्त होतात. 

It can be done to thwart work! | ​कामाचा कंटाळा घालविणे शक्य!

​कामाचा कंटाळा घालविणे शक्य!

ल करे सो आज कर, आज करे सो अब’ असे आपल्याकडे म्हटले जाते. आजचे काम उद्यावर ढकलू नये, कारण उद्या कधीच येत नसतो.

विद्यार्थी असो वा प्रौढ, सर्वजण ‘उद्यापासून पक्का हे काम करणार’ असे म्हणतात आणि ते कधीच करत नाही. इच्छा असूनही केवळ कंटाळा म्हणून आपण काम करण्याचे टाळतो. ही सवय आपल्या प्रगतीच्या आड येते.

तुम्हाला जर कामाचा कंटाळा घालवायचा असेल तर ते शक्य आहे. एका रिसर्चमध्ये असे दिसून आले की, प्रेरित केले असता लोक काम करण्यास उद्युक्त होतात.

‘न्यरॉन’ जर्नलमध्ये प्रकाशित एका लेखात सांगण्यात आले की, संशोधकांनी काही लोकांवर प्रयोग केला. ध्यान आणि लक्ष कें द्रित करणाºया मेंदूच्या भागाचे एफएमआरआय स्कॅन करून निरिक्षण केले. लोकांना प्रेरणा दिली असता त्याभागात विद्यूत सिग्नल्स अ‍ॅक्टिव्हेट झाल्याचे निदर्शनास आले. स्वप्रेरणेमुळे त्या भागात सर्वात जास्त हालचाल दिसून आली.

Procrastination

‘कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी’द्वारे आपले विचार आणि काम करण्याची इच्छा जागृत केली जाऊ शकते. एकदा का योग्य ती प्रेरणा मिळाली की, काम करण्यासाठी तिचा वापर केला जाणे शक्य आहे.

Web Title: It can be done to thwart work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.