लग्नानंतरचं ईशाचं पहिलंचं फोटोशूट; अंबानींच्या लेकीचा ग्लॅमरस लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 16:12 IST2019-02-06T16:10:49+5:302019-02-06T16:12:01+5:30
रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी डिसेंबर 2018मध्ये आपली लग्नगाठ बांधली.

लग्नानंतरचं ईशाचं पहिलंचं फोटोशूट; अंबानींच्या लेकीचा ग्लॅमरस लूक!
रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी डिसेंबर 2018मध्ये आपली लग्नगाठ बांधली. ईशा आणि आनंद यांचं लग्न 2018मधील सर्वात मोठं लग्न ठरलं असून त्याची चर्चा अनेक दिवस रंगल्या होत्या. लग्नानंतर ईशा अंबानी प्रसिद्ध फॅशन मॅग्झिन Vogueच्या कव्हर पेजवर दिसून आली.
वोग मॅग्झिनच्या कव्हरपेजसाठी ईशा अंबानीने एक फोटोशूट केलं होतं. ज्यामध्ये ईशा फार ग्लॅमर्स दिसत होती. पाहूयात ईशाने केलेल्या फोटोशूटचे काही फोटो...
मल्टी कलर लेयर्ड असलेला लॉन्ग स्कर्ट आणि ब्लॅक ब्लेझरसोबत ओपन केस ठेवले होते. ईशाने फॉर्मल आणि कॅज्युअल दोन्ही लूक एकत्र कम्बाइन केले होते. त्यामध्ये ती फार सुंदर दिसत होती.
वोगच्या यो फोटोशूटमध्ये ईशा अंबानीचा ग्लॅमर्स अवतार दिसून आला. ब्लॅक आणि ब्ल्यू कलरच्या ऑफ शोल्डर फ्रिल गाउनला ईशाने ब्लिन्जी जॅकेटसोबत टीप अप करून वेअर केलं होतं. तिचा हा लूक एखाद्या मॉडेलप्रमाणे दिसत होता.
वोग मॅग्झिनच्या कव्हरपेजवर आलेल्या ईशा अंबानीने फोटोशूटसोबतच वोग मॅग्झिनसाठी एक्सक्लूसिव इंटरव्यूदेखील दिला होता. ज्यामध्ये तिने आपलं लग्न, लग्नाआधीचं आयुष्य आणि लग्नानंतरच्या आयुष्याबाबत सांगितले.
इंटरव्यूमध्ये ईशा अंबानीने आपल्या कुटुंबाबाबत आणि भविष्यामधील तिच्या प्लॅन्सबाबतही सांगितले.
पाहा ईशाचे आणखी काही सुंदर फोटो :