IPL Fever : IPL विषयी सर्वात वाईट काम येथे होत आहे, हजारो लोक पाहत आहेत लाइव !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 16:53 IST2017-04-22T11:23:47+5:302017-04-22T16:53:47+5:30
IPL चाहत्यांनो, पाहा येथे काय सुरु आहे....
.jpg)
IPL Fever : IPL विषयी सर्वात वाईट काम येथे होत आहे, हजारो लोक पाहत आहेत लाइव !
आयपीएल आणि वाद हे जणू समिकरणच झाले आहे. हे वाद वाढतच आहेत. जसे कधी पार्टी, कधी थापट, कधी फिक्सिंग, ललीत मोदी प्रकरण, चेन्नई सुपर किंग्जला सस्पेंड करणे, राजस्थान रॉयल्स संंपुष्टात येणे आदी. विशेष म्हणजे आयपीएलला सर्वात जास्त पैसा टीव्हीतर्फे मिळत आहे. जाहीरातबाजी आणि अजून काय-काय....
टीव्हीवर आता लाइव्ह मॅच कोणी पाहू शकत नाही. अशावेळी ते अशा लिंक्स शोधतात जिथे क्लिक केल्यावर त्यांना लाइव्ह मॅच पाहावयास मिळेल. हॉटस्टार एक पर्याय आहे, मात्र तिथेही पैसे मोजावे लागतात आणि मोफत पाहायचे म्हटले त्यासाठी वेळ लागतो. आयपीएलमध्ये सेकंदात असे काही घडू शकते जे आपण विचार पण नाही करु शकत. जर पाच मिनीट उशिराने पाहिले तर नुकसानच नुकसान.

मात्र फेसबुकवर असे एक पेज आहे ज्या पेजवर लाइव्ह मॅच स्ट्रीम होत असते आणि हे पेज एकावेळी हजारो लोक पाहत असतात. या पद्धतीने आयपीएलला खूपच नुकसान होत आहे. हे स्ट्रीमिंग अवैध आहे, जे बंद व्हायला हवे, मात्र फेसबुकच्या पॉलिसीमुळे हे दुर्लक्षित आहे.
फेसबुकची पॉलिसीमध्ये हे आहे की, जर कोणी या व्हिडिओचा रिपोर्ट करेल तर फेसबुक त्याला रिव्यू करतो, मात्र आतापर्यंत कोणीच रिपोर्ट केला नव्हता.
ज्यावेळी याची मात्र दखल घेण्यात आली त्यानंतर थोड्याच वेळात एक-एक करुन सर्व व्हिडिओज डिलीट केले जात आहेत. आणि काही वेळानंतर हे पेजदेखील नाहिसे झाले. मात्र थोड्या वेळानंतर याच नावाने पुन्हा हे पेज दिसले ज्याला नव्या पद्धतीने लोक लाइक करीत आहेत शिवाय नव्या प्रकारची माहिती (कव्हर इमेज आणि प्रोफाइल पिक्चर) टाकण्यात येत आहे.

मात्र या पेजवर लाइव्ह दाखविणे कमी झाले आहे. लाइव्ह दाखविले जात आहे पण एक लहानसे दृष्य. लाइव्ह दृष्य कमी आणि फोटो मात्र जास्त शेयर होत आहेत आणि लोकांना लाइव आयपीएलच्या नावाने मुर्ख बनविले जात आहे.