​ईशा अंबानीला हार्वड, स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 21:07 IST2016-05-11T15:37:46+5:302016-05-11T21:07:46+5:30

जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक हार्वड आणि स्टॅनफोर्ड या दोन्ही पैकी एकाची निवड करण्याचा तिच्या समोर प्रश्न आहे.

Invitation to Isha Ambani at Harvard, Stanford University | ​ईशा अंबानीला हार्वड, स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे निमंत्रण

​ईशा अंबानीला हार्वड, स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे निमंत्रण

शातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाला अमेरिकेतील एक नाही तर दोन सुप्रतिष्ठित विद्यापीठांकडून प्रवेश घेण्यासाठीचे निमंत्रण मिळाले आहे.

जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एक हार्वड आणि स्टॅनफोर्ड या दोन्ही पैकी एकाची निवड करण्याचा तिच्या समोर प्रश्न आहे. मुकेश अंबानींची मुले, ईशा आणि आकाश, दोघेही कौटुंबिक व्यवसायाशी जोडलेले आहेत.

गेल्या वर्षी दोघेही रिलायन्स ग्रुपच्या टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याच्या सोहळ्याला हजर होते. उच्च शिक्षण घेऊनच ईशा पूर्णवेळ बिझनेसमध्ये लक्ष देणार असल्याचे बोलले जाते.

2014 साली ईशाने येल विद्यापीठातून मानसशास्त्र व साऊथ एशियन स्टडिज या विषयांत डिग्री मिळवली. आता एमबीए अभ्यासक्रमासाठी तिला वरील दोन विद्यापीठांत अ‍ॅडमिशन मिळत आहे.

तिने हार्वडची निवड केली तर ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांची मुलगी आरती काजी, संजय नायर यांचा मुलगा अद्वैत तिचे सिनियर्स असतील.

Web Title: Invitation to Isha Ambani at Harvard, Stanford University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.