आंतरराष्ट्रीय योगादिनी संयुक्त राष्ट्र एक विशेष तिकीट प्रकाशित करणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 18:25 IST2017-04-21T12:55:49+5:302017-04-21T18:25:49+5:30
योगाचे महत्त्व पाहता आगामी २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त संयुक्तराष्ट्रांनी एक विशेष तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय योगादिनी संयुक्त राष्ट्र एक विशेष तिकीट प्रकाशित करणार !
स २०१५ पासून संयुक्तराष्ट्रांत योग दिन साजरा केला जातो. योगाचे महत्त्व पाहता आगामी २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त संयुक्तराष्ट्रांनी एक विशेष तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. संयुक्तराष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. यानिमित्ताने पोस्टल अॅडमिनीस्ट्रेशनतर्फे त्यादिवशी एका विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या टपाल तिकीटांवर ओम हे पवित्र अक्षर लिहीले जाणार असून योगाची विविध आसनेही त्यावर दर्शवण्यात आली आहेत. डिसेंबर २०१४ मध्ये संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत योगदिनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. त्याला १७७ राष्ट्रांनी पाठिंबा दिला आहे. टपाल तिकीट प्रकाशनाचा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रांच्या न्युयॉर्क, जिनीव्हा, आणि व्हिएन्ना येथे एकाच वेळी होणार आहे.