INTERESTING : जाणून घ्या, महिलांना का बोलू नयेत ‘हे’ १२ शब्द !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 17:07 IST2017-04-01T11:37:37+5:302017-04-01T17:07:37+5:30
असे काही शब्द आहेत, ज्यांच्या वापराने महिला दुखावली जाते आणि आपल्या नात्यात दुरावा निर्माण होतो. जाणून घेऊया ते कोणते शब्द आहेत.
.jpg)
INTERESTING : जाणून घ्या, महिलांना का बोलू नयेत ‘हे’ १२ शब्द !
महिलांशी बोलताना पुरूषांना सावधच राहावे लागते. मात्र त्यांना हे देखील माहित असावे की, असे कोणते शब्द आहेत जे त्यांना कोणत्याही स्वरू पात महिलांसमोर बोलायचे नाहीत. विशेष म्हणजे हे शब्द महिलांचा अपमानच करीत नाही, तर त्यांच्या व्यक्तित्त्वालासुद्धा धक्का पोहचवतात. आपण जाणून घेऊया की, ते असे कोणते शब्द आहेत.
इगो
महिलांना हा शब्द अजिबात आवडत नाही. विशेष म्हणजे ज्या महिलांचा आत्मविश्वास असतो, काही पुरु ष त्याला तिचा इगो समजतात. आणि असे बोलून तिची निगेटिव्ह भूमिका जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते तसे नसते. कधीही महिलांशी बोलताना तिला इगो बोलायचे नाही, न तिच्या समोर, न तिच्या मागे.
बहीणजी
तसा बहीण हा शब्द सन्मानपूर्वक आहे. मात्र आपल्या समाजात या शब्दाची वेगवेगळी व्याख्या आहे. या शब्दानुसार बहीणजी त्या महिला असतात, ज्या नासमज, ग्रामीण, अशिक्षित आहेत. यासाठी ज्या महिला मॉडर्न आहेत, जगाचे ज्ञान आहे त्यांना हा शब्द कधीच आवडत नाही. जे पुरुष महिलांचा सन्मान करतात, त्यांनी या शब्दाचा प्रयोग चांगल्या संदर्भात करावा नाहीतर बोलूच नये.
कॅरेक्टर लेस
हा एक असा शब्द आहे, जो कोणत्याच महिलेला ऐकायला अजिबात आवडत नाही. बऱ्याचदा पुरु ष संतापात या शब्दाचा सहज वापर करतात, आणि त्याला या शब्दाच्या संवेदनशीलतेची जाणीवही नसते. खरे म्हणजे कॅरेक्टर लेस हा शब्द एका महिलेच्या व्यक्तित्त्वाला पूर्ण पलटून टाकतो. तिच्या मान सन्मानाला ठेच पोहचवितो. यासाठी आपणात जराही संवेदनशीलता असेल तर या शब्दाचा वापर अवश्य टाळा.
स्वीटी
जरा विचार करा की, आपण कुणालाही स्वीटी म्हणून बोलवू शकतो का? अजिबात नाही. कारण कोणत्याही महिलेला स्वीटी म्हणणाचा अर्थ म्हणजे आपण तिच्यासोबत असभ्यतेने वागत आहात. जेव्हा आपण एखाद्या महिलेला ओळखतो आणि तिचे व तुमचे अंतरंगाचे नाते आहे, तेव्हाची गोष्ट वेगळी असते. मात्र असे काहीही नसेल तर स्वीटी शब्दाचा उपयोग करुच नका.
ओव्हर स्मार्ट
एखाद्या महिलेला ओव्हर स्मार्ट म्हणणे म्हणजे तुम्ही तिच्या स्मार्टनेसबद्दल शंका उपस्थित करीत आहात. म्हणून असे बोलून तुम्ही तिचा अपमान करीत आहात, असे तिला वाटते. यामुळे हा शब्द कदापी वापरू नका.
ओव्हर रिअॅक्ट
प्रत्येक महिलेचा कोणत्याही कारणावरून रिअॅक्ट करण्याचा आपापला अंदाज असतो. म्हणून तिला वारंवार ओव्हर रिअॅक्ट म्हटले तर ते योग्य नाही.
लठ्ठ
कोणत्याच महिलेला तिच्या फिगरविषयी एखाद्या पुरुषाने बोललेले आवडत नाही. म्हणून तिच्या फिगरवरून कधीही कोणती कमेंट करु नका, जर ती लठ्ठ असेल तर विशेष काळजी घ्यावी.
काळी
महिला काळी असो वा गोरी, याने कोणाला काहीच फरक पडू नये. आणि तिला या प्रकारचे शब्ददेखील आवडत नाही. तर या प्रकारचे शब्द कोणत्याही ओळखीच्या किंवा अनोळखी महिलांसाठी वापरु नका.
अशिक्षित
अशिक्षित बोलणे म्हणजे एकप्रकारे तिचा अपमान करणे होय. अशाने ती खूप दु:खीदेखील होऊ शकते. त्यामुळे हा शब्दप्रयोेग टाळा.
चमची
बऱ्याचदा एखादी मुलगी दुसऱ्याच्या प्रति प्रतिबद्ध असते, तेव्हा आपण तिला चमची बोलतो. मात्र असे बोलणे म्हणजे तिच्या प्रतिबद्धतेवर शंका व्यक्त करणे होय. सोबतच तिचे मनदेखील खूप दुखावते.
आय डोंट केअर
एखाद्या महिलेला हे लहानसे वाक्य बोलणार तर तिला हेच वाटेल की, तिचे तुमच्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही. आपणास सांगू इच्छितो की, महिला खूपच संवेदनशील असतात. म्हणून या प्रकारच्या शब्द प्रयोगाने ती दु:खी होऊ शकते.
वेडसर (पागल)
पे्रमात वेडसर किंवा पागल म्हणणे वेगळी गोष्ट आहे. मात्र संतापात या शब्दाचा वापर कधीही करु नका. असे बोलल्याने तिला वाटेल की, आतापर्यंत आपल्याला समजदार आणि हुशार समजणारा व्यक्ती असे बोलून तिच्या हुशारीवर शंका व्यक्त करतोय. म्हणून असे बोलणे टाळा.