Interesting : मोबाइलसंबंधीत ‘हे’ रोचक तथ्य आपणास माहित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2017 17:15 IST2017-06-10T11:45:09+5:302017-06-10T17:15:09+5:30
जगातला पहिला मोबइल कधी लॉन्च झाला? पहिला कॉल, पहिला एसएमएस कधी करण्यात आला ? हे सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा...!
.jpg)
Interesting : मोबाइलसंबंधीत ‘हे’ रोचक तथ्य आपणास माहित आहेत का?
गरीब असो की, श्रीमंत आज प्रत्येकाजवळ मोबाइल आहे. मोबाइल जणू प्रत्येकाच्या आयुष्याचा घटकच बनला आहे. कॉल, एसएमएस पासून ते आॅनलाइन पेमेंट पर्यंत आज प्रत्येक गोष्ट मोबाइलवरून होऊ लागली आहे. आपल्या रोजच्या वापरातला मोबाइल जरी रात्रंदिवस असला तरी मोबाइलसंबंधीत अशा काही रोचक गोष्टी आहेत, ज्या अजूनही आपणास माहित नाहीत. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...!
* ३ एप्रिल १९७३ ला मोटोरोला कंपनीचे रिसर्च मार्टिन कूपर यांनी पहिल्यांदा डॉ. जोएल एस. एंगल यांना कॉल केला होता. हा जगातील पहिला कॉल होता.
* जगातील पहिला वॉइस मेल १९८३ मध्ये पाठविण्यात आला होता. तोपर्यंत मोबाइलवर इंटरनेट चालविणे अशक्य होते.
* १९८३ मध्ये मोटोरोला कंपनीद्वारा एक मोबाइल बनविण्यात आला ज्याची किंमत २.५ लाख रुपये होती.
* मोबाइलवर पहिला एसएमएस १९९२ मध्ये संगणकाद्वारे पाठविण्यात आला होता.
* जगातील पहिला स्मार्टफोन ‘आयबीएम सीमॉन’ होता ज्यात कॅलेंडर, टच स्क्रिन आणि बऱ्याच प्रकारचे स्मार्ट फिचर होते जो १९९३ मध्ये लॉन्च करण्यात आला होता.
* ‘नोकिया ११००’ हा आतापर्यंत जगातील सर्वात विकला जाणारा मोबाइल आहे, याला २००३ मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याचे सुमारे २५ करोड सेट संपूर्ण जगात विकले गेले होते.
* जगातील सर्वात महाग मोबाइल अॅप्पल कंपनीने लॉन्च केला होता ज्याची किंमत ७८ लाख ५० हजार डॉलर होती.
* जगातील सुमारे ७० टक्के मोबाइल चीनमध्ये बनविले जातात.
* जपानमध्ये ९० टक्के मोबाइल युजर्स अंघोळ करतेवेळी वापरतात.
* जगात सुमारे ५० टक्के लोक आपल्या मोबाइलचा वापर गेम्स खेळण्यासाठी करतात.
Also Read : Tech : व्हॉट्सअॅपबाबत ‘या’ १० अमेजिंग गोष्टी जाणून व्हाल चकित !