...हा तर टीव्ही अँकरचा ‘आॅन एअर’ अपमान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 20:10 IST2016-05-18T14:40:03+5:302016-05-18T20:10:03+5:30

तिने घातलेल्या कपड्यांबाबत प्रेक्षकांच्या तक्रारींचे ई-मेल्स येत आहेत.

... this is an insult to the TV anchor 'an air'! | ...हा तर टीव्ही अँकरचा ‘आॅन एअर’ अपमान!

...हा तर टीव्ही अँकरचा ‘आॅन एअर’ अपमान!

ज सकाळी वेळापत्रकाप्रमाणे टीव्ही प्रेझेंटर लिबर्टी चॅन हवामानाचा अंदाज व तापमानाची माहिती देत होती. परंतु अचानक कॅमेºयांच्या मागून कोणी तरी तिला थांबवतो आणि स्वेटर घालण्यास सांगतो.

एवढेच नाही तर आॅन एअर तिला स्वेटरदेखील देतो. चॅनेल क्रू च्या अशा वागण्याने गोंधळलेल्या लिबर्टीने जेव्हा बळजबरी स्वेटर घालण्याबाबत विचारले तेव्हा तिला सांगण्यात आले की, तिने घातलेल्या कपड्यांबाबत प्रेक्षकांच्या तक्रारींचे ई-मेल्स येत आहेत.

लॉस एंजलिस येथील ‘केटीएलए 5’ या न्यूज चॅनेलवर हा सगळा प्रकार लाईव्ह घडला. आॅन एअर ब्रॉडकास्ट दरम्यान अशा प्रकारे लिबर्टीला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल चॅनेलवर चौफेर टीका होत आहे.

सोशल मीडियावर अनेक लोकांनी ट्विट आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला.

एकाने लिहिले, ‘तिच्या ड्रेसविषयी जरी तक्रार असली तरी तिला आॅन एअर स्वेटर घालण्यासाठी भाग पाडणे नक्कीच बरोबर नाही. चॅनेलनी तिची जाहीर माफी मागावी.  

Liberte Chan

एका महिलेने ट्विट केले की, एका महिलेला तिच्या कामादरम्यान या प्रकारे लाजवणे जाणे कितपत योग्य आहे?

Web Title: ... this is an insult to the TV anchor 'an air'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.