​इंडोनेशियातील आदीमानवाचे रहस्य उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 02:02 IST2016-02-19T09:02:10+5:302016-02-19T02:02:10+5:30

नवीन संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला की, इंडोनेशियात सापडलेले आदीमानव होमो सेपियन नसून नवीनच प्रजातीचे मानव होते.

In Indonesia, the mystery of the modern age was revealed | ​इंडोनेशियातील आदीमानवाचे रहस्य उलगडले

​इंडोनेशियातील आदीमानवाचे रहस्य उलगडले

नववंशशास्त्रामध्ये सध्या खळबळ माजली आहे. इंडोनेशियात सापडलेल्या आदीमानावांचे जीवाश्म होमो सेपियन आहेत की नाहीत यावर मानववंशशास्त्रज्ञांमध्ये मतभेद होते. परंतु नुकतेच एका नवीन संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला की, १५ हजार वर्षांपूर्वी मृत झालेले हे आदीमानव होमो सेपियन नसून नवीनच प्रजातीचे मानव होते.

२००३ मध्ये इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावर सापडलेल्या या जीवाश्मांची उंची कमी असल्यामुळे त्यांना ‘हॉबिट’ म्हणून ओळखले जाते. त्यांची उंची कमी असण्याचे कारण एखादा आजार होता की ते होमोसेपियन प्रजातीपेक्षा वेगळी प्रजाती आहे यावर संशोधकांचा खल चालू होता.

या नव्या अध्ययनात जीवाश्मांच्या डोक्यातील हाडांचे विश्लेषण केले असता स्पष्ट झाले की ते होमो सेपियन्स नाहीत. यापूर्वी काही संशोधकांच्या मते लार्जर होमो इरेक्टस प्रजातीचे वंशज पुढे चालून असे कमी उंचीचे झाले असावेत.

Web Title: In Indonesia, the mystery of the modern age was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.