केटने परिधान केला भारतीय डिझायनरचा ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 15:26 IST2016-04-08T22:26:39+5:302016-04-08T15:26:39+5:30
ब्रिटनच्या राजघराण्याची सुन केट मिडलटन एका कार्यक्रमात भारतीय डिझायनरने बनविलेला पोशाख परिधान करून बघावयास मिळाली.

केटने परिधान केला भारतीय डिझायनरचा ड्रेस
ब रिटनच्या राजघराण्याची सुन केट मिडलटन एका कार्यक्रमात भारतीय डिझायनरने बनविलेला पोशाख परिधान करून बघावयास मिळाली. ब्रिटनच्या केसिंग्टन पॅलेसमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे भारतीय आणि भूटानचे प्रवाशी वास्तव्य करतात. केटचा हा पोशाख मोठ्या कॉलरचा होता, ज्यावर डॉट्स होते. लंडनमधील भारतीय मुळ निवासी असलेल्या फॅशन डिझायनर सलोनी लोढा हिने हा पोशाख डिझाइन केला आहे. केटने पती प्रिंस विलियमसोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. कॅट आणि विलियम पुढच्या आठवड्यात भारत आणि भुटानचा दौरा करणार आहेत. भारतात ते काजीरंगाचे राष्टÑीय उद्यान आणि ताजमहालला भेट देणार आहेत. तसेच दुबईला देखील त्यांचा या दरम्यान दौरा आयोजित करण्यात आला आहे.