​फेसबुकची लोकप्रियता आणखी जोरावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 21:48 IST2016-05-27T16:18:33+5:302016-05-27T21:48:33+5:30

फेसबुक मंथली यूजर्सची संख्या 165 कोटीवर पोहाचली आहे.

Increasing the popularity of Facebook | ​फेसबुकची लोकप्रियता आणखी जोरावर

​फेसबुकची लोकप्रियता आणखी जोरावर

शल मीडिया किं ग ‘फेसबुक’ची लोकप्रियता एक दशकानंतरही कमी होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. कंपनीने या वर्षीच्या पहिल्या तिमाहीची जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फेसबुक मंथली यूजर्सची संख्या 165 कोटीवर पोहाचली आहे. 

गत वर्षांच्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत 3.7 टक्क्यांच्या वृद्धीसह फेसबुकवर प्रतिमाह सक्रीय यूजर्सची संख्या 159 कोटींवरून आता 165 कोटींपर्यंत वाढला आहे. एवढेच नाही तर दररोज फेसबुक वापरणाऱ्या यूजर्सची संख्या 4.8 टक्क्यांनी वाढून 109 कोटी झाली आहे.

कंपनीच्या फेसबुक, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम अशा विविध सोशल मीडिया वेबसाईटवर लोक दररोज सरासरी 50 मिनिटे व्यतीत करतात. बरं यामध्ये व्हॉटस्अ‍ॅप वापरणाऱ्या यूजर्सचा सामावेश करण्यात आलेला नाही. 

जाहिरात उत्पन्नाचा सुमारे 80 टक्के भाग हा मोबाईल जाहिरातीमधून मिळतो. 2016 च्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न 520 कोटी डॉलर्स (सुमारे 34.8 हजार कोटी रु.) एवढे राहिले. गेल्या वर्षीच्या तुलनेत (330 कोटी डॉलर्स) यंदा 57 टक्क्यांची वाढ झाली.

Facebook


Facbook

Web Title: Increasing the popularity of Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.