सॅलरी निगोशिएशनसाठी महत्त्वाच्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:12 IST2016-01-16T01:15:25+5:302016-02-13T04:12:10+5:30

सॅलरी निगोशिएशनसाठी महत्त्वाच्या टीप्स एकाच कंपनीत काम करून कित्येक वर्षे झाली परंतु अजुनही मनासारखी पगारवाढ होत नाही असे खूप लोक असतात. कंपनी कधीतरी आपला प्रामाणिकपणा आणि लॉयल्टीपाहून पगारवाढ करेल या भ्रामक आशेवर ते दिवस काढत असतात. मुळात पगारवाढ कशी मागावी हेच त्यांना कळत नाही.

Important Tips for Salary Negotiations | सॅलरी निगोशिएशनसाठी महत्त्वाच्या टीप्स

सॅलरी निगोशिएशनसाठी महत्त्वाच्या टीप्स

ाच कंपनीत काम करून कित्येक वर्षे झाली परंतु अजुनही मनासारखी पगारवाढ होत नाही असे खूप लोक असतात. कंपनी कधीतरी आपला प्रामाणिकपणा आणि लॉयल्टीपाहून पगारवाढ करेल या भ्रामक आशेवर ते दिवस काढत असतात. मुळात पगारवाढ कशी मागावी हेच त्यांना कळत नाही. सॅलरी निगोशिएशन ही कला असते आणि एखाद्या स्पोर्ट एजंटपेक्षा ही कला कोण जास्त चांगली शिकवू शकते? प्रसिद्ध स्पोर्ट एजंट एड वाझिएलेविस्की यांनी पगारवाढ कशी मागावी यासाठी ५ महत्त्वपूर्ण टीप्स दिल्या आहेत.
१. स्वत:ची व्हॅल्यू जाणून घ्या
तुम्ही करत असलेल्या कामाचा योग्य मोबादला किती यासाठी थोडा होमवर्क करा. परंतु असे करत असताना प्रॅक्टिकल असणे गरजेचे असते. बर्‍याच लोकांना असे वाटते, की आहे त्यापेक्षा दुप्पट पगार त्यांना मिळायला पाहिजे. अशा प्रकारे पगारवाढ मागण्याची चूक कधीही करू नका.
२. पाठपुरावा करा
एकदा का तुम्ही होमवर्क करून योग्य आकडा ठरवला तर वाटाघाटी करत असताना त्याचा पाठपुरावा करा. अपेक्षित पगार मिळवण्यास तुम्ही कसे सक्षम आहात हे पटवून द्या. मात्र जिद्दीला पेटू नका. निगोशिएनमध्ये अप आणि डाऊन येतच असतात.
३. इतरांशी तुलना करू नका
ऑफिसमध्ये त्याला इतका पगार तर मला का नाही, असे अनेक जणांना वाटत असते. सहकार्‍याला मिळाला तितका पगार तुम्हाला मिळेलच असे नाही. अशी तुलना तुम्हाला अनप्रोफेशनल ठरवू शकते. त्यामुळे पगारवाढीची शक्यता आहे त्यापेक्षाही कमी होऊन जाते.
४. पगार म्हणजे केवळ पैसा नाही
बर्‍याच लोकांचा असा गैरसमज असतो, की पैसे वाढून मिळणे म्हणजे पगारवाढ. समजा तुम्हाला ३ लाखांच्या पॅकेजची अपेक्षा आहे. मात्र कंपनी तयार नसेल तुम्ही २.७ लाख पगार आणि वाढीव मेडिकल इंश्योरन्स मागू शकता. पगारवाढीचा हा स्मार्ट मार्ग आहे.
५. दुसरा पर्याय तयार ठेवा
तुमची मेहनत, काम, ओव्हर टाईम सगळे सांगून झाल्यावरही पगार वाढत नसेल तर दुसर्‍या नोकरीचा शोध सुरू करा. कोणत्याच कंपनीला अनुभवी आणि कार्यक्षम कर्मचारी सोडून जाणे फायद्याचे नसते. पण असे करताना उतावळेपणा करू नये.

Web Title: Important Tips for Salary Negotiations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.