यशस्वी स्वयंउद्योजकांच्या महत्त्वपूर्ण पाच सवयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:11 IST2016-01-16T01:12:32+5:302016-02-07T12:11:38+5:30

यशस्वी स्वयंउद्योजकांच्या महत्त्वपूर्ण पाच सवयी स्वत:च्या हिंमतीवर व्यवसाय करण्याचे धाडस करणे ही खर...

Important five habits of successful self-employed | यशस्वी स्वयंउद्योजकांच्या महत्त्वपूर्ण पाच सवयी

यशस्वी स्वयंउद्योजकांच्या महत्त्वपूर्ण पाच सवयी

स्वी स्वयंउद्योजकांच्या महत्त्वपूर्ण पाच सवयी स्वत:च्या हिंमतीवर व्यवसाय करण्याचे धाडस करणे ही खरोखरच फार मोठी गोष्टी आहे. बिझनेस वृद्धीसाठी अनेक व्यावसायिक दिवसरात्र एक करून घाम गाळतात. कामाचा व्याप इतका असतो की महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. मात्र यशस्वी उद्योजक तेच असतात जे कितीही व्यग्र असले तरी पुढील पाच सवयींना विसरत नाहीत.


१. ठराविक दिनचर्या
कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी स्वत:ला शिस्त लावणे फार गरजेचे असते. शिस्तीने रोजचा दिनक्रम ठरवल्यामुळे कामे करण्यास बरोबर वेळ मिळतो. स्वयंद्योजक हे जाणतात म्हणून ते स्वत:च्या गरजा आणि वेळ ओळखून दिनक्रम निश्‍चित करतात.


२. व्यायाम
व्यायामाचे महत्त्व आता वेगळे सांगण्याची काही गरज नाही. जगातील टॉप सीईओ व्यायामाला विशेष प्राधान्य देतात. अँपल, झेरॉक्स, पेप्सी आणि स्टारवूड हॉटेल्सचे सीईओ दिवसाची सुरुवात जिममध्ये घाम गाळूनच करतात. योगामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते असे त्यांचे म्हणणे आहे.


३. कामगिरीवर लक्ष
बरेच लोक कामात एवढे गर्क होतात की एक सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची विसरतात. ती म्हणजे स्वत:ची कामगिरी तपासणे. आपण ठरवलेले ध्येय गाठले का, अजून किती काम बाकी आहे, आपली स्ट्रेंग्थ काय, या सर्व गोष्टींवर तुम्ही रोजच्या रोज लक्ष दिले पाहिजे.


४. कुटुंबीयांसोबत वेळ
यशस्वी लोक आपल्या परिवाराला वेळ देण्यास प्राधान्य देतात. कितीही व्यग्र असले तरी दिवसातून काही काळ ते आपल्या मुलांसाठी, पत्नीसाठी जरूर काढतात. यामुळे अजून जोमाने काम करण्याची शक्ती आणि प्रेरणा त्यांना मिळते.


५. भविष्यावर नजर
यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ आज काय चालू आहे यावर लक्ष देणे पुरेसे नाही. उद्यावर नजर ठेवून भविष्याचा अंदाज बांधणारे लोकच आयुष्यात सक्सेसफुल ठरतात. क्षणाक्षणाला बदलणार्‍या या जगाचा अचूक वेध घेणे तुम्हाला जमले पाहिजे.

Web Title: Important five habits of successful self-employed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.