एकाचवेळी तरूण, हटके, फॅशनेबल आणि टे्रण्डी दिसायचंय मग जुन्या काळातले ‘झालर’चेम्हणजे आताचे ‘रफल्स’ वापरा!
By Admin | Updated: May 4, 2017 17:58 IST2017-05-04T17:58:29+5:302017-05-04T17:58:29+5:30
उन्हाळा, पावसाळा वा हिवाळा अशा कोणत्याही ॠतूत स्टायलिश दिसायचं असेल तर मग रफल्स वापरा !

एकाचवेळी तरूण, हटके, फॅशनेबल आणि टे्रण्डी दिसायचंय मग जुन्या काळातले ‘झालर’चेम्हणजे आताचे ‘रफल्स’ वापरा!
-मोहिनी घारपुरे-देशमुख
थोडंस स्टायलिश दिसायचं तर नवनवीन आऊटफीट ट्राय करायलाच हवेत नाही का.. पण हे नवनवीन आऊटफीट बनवताना अनेकदा फॅशन ब्रँड्स खरंतर जुन्याच फॅशन आयडीयाजमध्ये नवा टविस्ट देत असतात. अशातलीच एक फॅशन म्हणजे रफल्स.
तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी आपल्यापैकी अनेकजणींकडे फ्रीलचा म्हणजे झालरचा किमान एखादा तरी फ्रॉक होताच. हीच फ्रील केवळ बाह्यांनाच नव्हे तर संपूर्ण ड्रेसलाच लावली तर नवा आऊटफीट तयार होतो. हीच स्टाईल म्हणजे रफल्स. उन्हाळा, पावसाळा वा हिवाळा अशा कोणत्याही ॠतूत रफल्स स्टाईलचे कपडे छानच दिसतात. त्यांच्यामुळे आपला लूक एकदम बदलून जातो.