प्रेमात नाही पडलात तर कंगाल व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 17:52 IST2016-04-19T12:22:14+5:302016-04-19T17:52:14+5:30

आयुष्यात जोडीदार नसेल आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.

If you do not love, you will be poor! | प्रेमात नाही पडलात तर कंगाल व्हाल!

प्रेमात नाही पडलात तर कंगाल व्हाल!

ुष्यत प्रत्येकालाच प्रेम हवय. आयुष्यभर साथ देणारा जोडीदार हवाय. त्याच्यावर आपण जीव ओवाळून टाकावा आणि त्याने आपल्यासाठी झुरावे अशी इच्छा बाळगून आपण प्रेम शोधत असतो.

पण प्रेम मिळवणे एवढे सोपे नाही. प्रत्येकालाच मिळेल याची गॅरंटीदेखील नाही. तुम्हालासुद्धा जर अद्याप तुमचे खरे ‘प्रेम ’ मिळाले नसेल मोठी गुंतवणूक करण्याचा धोका पत्कारू नका!

एका रिसर्चमध्ये अत्यंत मजेशीर निष्कर्ष समोर आले आहेत. आयुष्यात जोडीदार नसेल आर्थिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. मिशिगन विद्यापीठातील प्रमुख संशोधक जोशुआ एकरमन यांनी सांगितले की, जोडीदाराच्या अनुपस्थित व्यक्तीची अधिक जोखमेची गुंतवणूक करण्याची वृत्ती जास्त असते. त्यामुळे आयुष्यात प्रेमळ जोडीदार असणे फार महत्त्वाचे असते.

प्रेम नसल्यामुळे माणूस अधिक धोका पत्कारतो. हाय रिस्क, हाय रिटर्न इन्व्हेस्टमेंट हा त्यांपैकीच एक प्रकार आहे. आपले लक्ष दुसरे कुठे केंद्रित करण्यासाठी व सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारचे वर्तन केले जाते. त्यामुळे यापुढे जरा जपून... कारण पुढे धोका आहे!

Web Title: If you do not love, you will be poor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.