हजेलमध्ये माझेच प्रतिबिंब दिसते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:35 IST2016-01-16T01:14:13+5:302016-02-07T10:35:26+5:30
हजेलमध्ये माझेच प्रतिबिंब दिसते! भारताचा क्रिकेटर युवराज सिंगची एंगेजमेंट ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल हजेल कीच हिच्यासोबत झाली आहे. हजेलमध्ये माझे प्रतिबिंब दिसते, असे युवराजच्या आई शबनम यांनी म्हटले आहे.

हजेलमध्ये माझेच प्रतिबिंब दिसते!
भ रताचा क्रिकेटर युवराज सिंगची एंगेजमेंट ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल हजेल कीच हिच्यासोबत झाली आहे. हजेलमध्ये माझे प्रतिबिंब दिसते, असे युवराजच्या आई शबनम यांनी म्हटले आहे. मला तिची सासू व्हायला आवडेल. या एंगेजमेंटला उपस्थित राहता आले नाही, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले प्रेमप्रकरण आपल्याला माहिती होते. युवराजने केलेली निवड ही योग्यच असणार, त्यामुळे त्या दोघांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे शबनम यांनी म्हटले आहे. युवी आणि मी आम्ही दोघेही खूश आहोत. मला मुलगी आवडली आहे. मला या एंगेजमेंटबद्दल माहिती होती. बाली हे ठिकाण निवडण्याबाबतही मी युवीला विचारले होते. सध्या युवी खेळासाठी बडोड्याला गेला आहे. तिथे तो फक्त खेळावर लक्ष केंद्रीत करेल, लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, असेही शबनम यांनी सांगितले आहे. मम्माज बॉय असलेल्या युवीने हा निर्णय घेण्याआधी पंजाबमधील आपल्या गुरुजींचा आशीर्वाद घेतला आहे. शबनम यांनी पुढे सांगितले की, हजेलमध्ये माझे प्रतिबिंब दिसते याचे कारण आम्ही दोघांनीही आयुष्यात खूप हार्ड वर्क केलेले आहे. आम्ही हळवे, प्रामाणिक, चांगले आणि इतरांचा आदर करणारे आहोत. त्यामुळे तिच्याशी जोडले जात असताना आनंद होत आहे. हजेल ब्रिटनची असली, तरी तिला आपल्याकडच्या कल्चरची चांगली माहिती आहे. तिची आई हिंदू असून, इथल्या परंपरांचाही तिचा परिचय आहे. अनेकवेळा असे घडते, की आपल्याला माहिती असलेली किवा नसलेली व्यक्ती आपल्यासाठी योग्य असते. दरम्यान, नेही धुपियाने युवराज आणि हजेलला शुभेच्छा दिल्या असूून, दोघांच्या एंगेजमेंटची बातमी खूपच आनंददायी असल्याचे म्हटले आहे. योगराज सिंग म्हणतात, युवराज आणि हजेलची जोडी खूपच सुंदर आहे. लग्नानंतर युवीमध्ये सकारात्मक बदल होतील. तो राष्ट्रीय पातळीवर स्वत:ला सिद्ध करेल. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत साधारण लग्नाची तारीख