​आर्यन कुणाशी डेट करतोय, हे मला माहित नाही - शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 16:58 IST2016-06-11T11:28:23+5:302016-06-11T16:58:23+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत राहणाऱ्या स्टार किड्समध्ये आर्यनचे नाव अग्रस्थानी आहे. बऱ्याच दिवसापासून तो एका मिस्ट्री गर्लला डेट करीत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

I do not know what Aryan is dating - Shah Rukh Khan | ​आर्यन कुणाशी डेट करतोय, हे मला माहित नाही - शाहरुख खान

​आर्यन कुणाशी डेट करतोय, हे मला माहित नाही - शाहरुख खान

्या बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेत राहणाऱ्या स्टार किड्समध्ये आर्यनचे नाव अग्रस्थानी आहे. बऱ्याच दिवसापासून तो एका मिस्ट्री गर्लला डेट करीत असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.  काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही तरुणी त्याची गर्लफ्रेंड असल्याचे सांगण्यात आले आहे. याविषयी त्याचे वडील शाहरुख खानला विचारले असता तो म्हणतो की, ‘मला माहित नाहीत आर्यन कुणाला डेट करतोय.

माझी मुले माझ्यासोबत मित्रासारखी वागतात. आमच्या आयुष्यात काहीही अडचणी आल्या किंवा काहीतरी नवीन करायचे असेल तर चर्चा करून केले जाते. परंतु आर्यनची आई गौरी यात माज्यापेक्षा जास्त चांगली भूमिका बजावते.’
शाहरुखच्या म्हणण्यानूसार तो कधीच मुलांना त्यांच्या व्यक्तिगत नात्याविषयी किंवा डेटींगविषयी प्रश्न विचारले नाहीत. आर्यन कुणाला डेट करतोय हे कदाचित गौरीला माहित असेल, असेही तो म्हणाला. 

आर्यन नव्या पुन्हा एकत्र...
काही दिवसांपूर्वी आर्यन आणि बिग बींनी नात नव्या नवेली नंदाचा एक एमएमएस लीक झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ फेक असल्याचे सांगण्यात आले. यावेळीसुध्दा असेच झाले. मात्र, हा एमएमएस नाहीये, परंतु त्यापेक्षा कमी नाहीये. आर्यन आणि नव्याचे थायलँड व्हॅकेशन इंटरनेटवर चचेर्चा विषय ठरले आहे. सोशल मीडियावर शेअर झालेल्या फोटोंमध्ये दोघे सोबत दिसत आहेत.

Web Title: I do not know what Aryan is dating - Shah Rukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.