ट्रेन्डमध्ये असलेली धोती वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करून तुम्ही मिळवू शकता डिफ्रंट लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 16:58 IST2018-09-06T16:58:03+5:302018-09-06T16:58:59+5:30
एखादी पार्टी असो किंवा फेस्टिव्हल. सर्वात आधी मुली आपल्या आउटफिटचा विचार करतात. सध्या फॅशन वर्ल्डमध्ये काय ट्रेन्ड आहे याचा विचार करून आपला लूक ठरविला जातो.

ट्रेन्डमध्ये असलेली धोती वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करून तुम्ही मिळवू शकता डिफ्रंट लूक!
एखादी पार्टी असो किंवा फेस्टिव्हल. सर्वात आधी मुली आपल्या आउटफिटचा विचार करतात. सध्या फॅशन वर्ल्डमध्ये काय ट्रेन्ड आहे याचा विचार करून आपला लूक ठरविला जातो. त्यामुळे लूक डिफ्रंट होण्यास आणि सर्वांपेक्षा वेगळं दिसण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या नजरा खिळतात. तुम्हीही तुमचा लूक सध्याच्या फॅशन ट्रेन्डनुसार हटके करू शकता. त्यासाठी तुम्ही सध्या ट्रेन्डमध्ये असलेल्या धोती सलवारचा आधार घेऊ शकता.
यूनिकमध्ये सर्वात बेस्ट ऑप्शन आहे इंडो वेस्टर्न आउटफिट्स. सध्या या आउटफिट्समध्ये सर्वात ट्रेन्डमध्ये आहे धोती सलवार. या धोती सलवारला बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील पसंती दिली आहे. जाणून घेऊयात बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये ट्रेन्डमध्ये असलेल्या धोती सलवारबाबत...
धोती तुम्ही तुमच्या आवडीनुसार, लॉन्ग किंवा शॉर्ट कुर्त्यांसोबत वेअर करू शकता. यामुळे तुम्हाला एक ट्रेडिशनल लूक मिळवण्यास मदत होईल.
क्रॉप टॉप सध्या फार ट्रेन्डमध्ये आहे. तुम्हीदेखील क्रॉप टॉप आणि धोती वेअर करू शकता. त्यामुळे तुम्हाला इंडो वेस्टर्न लूक मिळण्यास मदत होईल.
जर तुम्हाला तुमच्या लूकमध्ये थोडाफार चेंज हवा असेल तर क्रॉप टॉप आणि धोतीवर फ्लोअर लेन्थ जॅकेट तुम्ही ट्राय करू शकता.