पगार केवढा तर डोंगराएवढा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 04:35 IST2016-02-14T11:35:48+5:302016-02-14T04:35:48+5:30
गुगलचे सीईओ सुंदर पिचईचे वार्षिक पॅकेज पाहिले तर आपण काम तरी कशाला करतो असा प्रश्न त्यांना पडू शकतो.

पगार केवढा तर डोंगराएवढा!
गुगल पिचई यांना वर्षाला ३३५ कोटी रुपये पगार देते आणि नुकतेच कंपनीने त्यांना सुमारे १.४ हजार कोटी रुपयांचे शेअर्ससुद्धा दिले. २०१८ मध्ये पिचई हे शेअर्स कॅश करू शकतात.
अशा गलेगठ्ठ पगारामुळे पिचई आता जगातील सर्वाधिक पगार घेणाºयांच्या यादीत पोहोचले आहेत. पूर्वी गुगलमध्ये असलेले आणि आता जपानी कंपनी ‘सॉफ्टबँक’चे अध्यक्ष निकेश अरोरा यांना वार्षिक पॅकेज ८५० कोटी रुपये आहे. २०१४ साली अरोरा यांनी गुगल सोडले होते. एवढी सॅलरी मिळवणारे ते प्रथम आणि एकमेव भारतीय आहेत.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेलादेखील या स्पर्धेत मागे नाहीत. अमेरिकेतील सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ म्हणून त्यांची ओळख आहे. वर्षाला ५७५ कोटी रुपये त्यांना सॅलरी मिळते. पेप्सीच्या प्रमुख इंद्रा नुयीसुद्धा वर्षाकाठी १२९.९ कोटी रुपये कमावतात.