कन्नडमध्ये आर्ची-परशाच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 12:54 IST2016-06-19T07:24:10+5:302016-06-19T12:54:10+5:30
कन्नड येथे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातर्फे दहावी - बारावीच्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा कार्यक्रम होता.

कन्नडमध्ये आर्ची-परशाच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार
क ्नड येथे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातर्फे दहावी - बारावीच्या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला 'सैराट'चे कलाकार आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू परशा ऊर्फ आकाश ठोसरसह दिगदर्शक महेश मांजरेकर आदींनी हजेरी लावली होती. दुपारपासूनच कार्यक्रमस्थळी तरुणाई महिलांची गर्दी वाढत होती. परंतु अधिकचा पोलिस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. गर्दीला आवरताना पोलिसांना नाकीनऊ आला होता.
![]()
आर्ची आणि परशाची लोकप्रियता शिगेला पोहचली असून त्यांच्या हजेरीमुळे हजेरीमुळे कन्नड शहराला जत्रेचे स्वरूप आले होते. पारशा आर्चीने तरुणांशी संवाद साधताना केवळ गुणवंतांना शुभेच्छा देत अधिक बोलणे टाळले. एकूणच ‘सैराट’च्या कलावंतांनी कन्नडमध्ये झिंग झिंग झिंगाट करून उत्साह भरला होता. शहरात दिवसभर परशा आचीर्ची चर्चा होती. कार्यक्रमात गुणवंत १३ मुलांचा सत्कार झाला. या वेळी आ. हर्षवर्धन जाधव, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, संजना जाधव आदी उपस्थित होते. आर्ची-परशाची जोडी शहरात येणार असल्याने सकाळपासूनच तरुणांची गर्दी होती. सायंकाळी गर्दी वाढल्याने धुळे-औरंगाबाद महामार्गावरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता.