​नानांच्या हस्ते विलक्षण जोडपे सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 16:38 IST2016-06-01T11:08:39+5:302016-06-01T16:38:39+5:30

समाज करीत असलेल्या परंपरागत कार्याच्या विरुध्द दिशेने होणाºया कार्याला ‘विलक्षण’ कार्य म्हणतात.

Honored couple with great hands at the hands of Nana | ​नानांच्या हस्ते विलक्षण जोडपे सन्मानित

​नानांच्या हस्ते विलक्षण जोडपे सन्मानित

ाज करीत असलेल्या परंपरागत कार्याच्या विरुध्द दिशेने होणाºया कार्याला ‘विलक्षण’ कार्य म्हणतात. आणि त्यातही समाजसेवेला प्राधान्य दिले असेल तर त्याला असामान्य हा शब्द वापरला जातो. 

लग्नकार्य हे नेहमी मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडत असते. मात्र जर कोणी समाजसेवेच्या उद्देशाने लग्न आटोपते घेत असेल तर ही असामान्यच गोष्ट म्हणावी लागेल. 

पुणे विद्यापीठात संशोधन करणारा आनंद बनसोडे आणि अक्षया आरोटे यांचे २६ जानेवारी रोजी लग्न झाले. पण हा धार्मिक समारंभ नव्हता. सोलापूर येथील ‘संस्कार फाऊंडेशन’ मधील अनाथ मुलांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाचे वाचन करुन दोघे विवाहबध्द झाले. 

या असामान्य घटनेची ‘इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड’ने दखल घेतली. राज्यघटनेचे वाचन करुन विवाह सोहळा पार पाडल्यामुळे अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते आनंद आणि अक्षयाला प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

नानांनी आनंद आणि अक्षयने केलेल्या या अद्वितीय पराक्रमाचे कौतुक केले आणि आनंद-अक्षय या कौतुकाने भारावून गेले.

Web Title: Honored couple with great hands at the hands of Nana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.