मातृभाषेसोबतच इतर भाषांचा सन्मान करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 06:33 IST2016-02-20T13:33:06+5:302016-02-20T06:33:06+5:30

सर्वांना आपली बोलीभाषा आवडीची असते, सर्वांनी तिच भाषा बोलावी असा प्रत्येकाचा समज असतो. म्हणूनच राज्यविस्तार करताना भाषांचा आग्रह धरला गेला. यामुळे अन्य भाषा नष्ट होत गेल्या. भाषेचा संबध केवळ भावनांशी नाही तर तो सांस्कृतीशी आहे. यातूनच 1999 पासून ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आणि जगभरात या दिवशी मातृभाषेच्या सन्मानाचे सोहळे साजरे व्हायला लागले. याला कारणही तसेच आहे. परकीय भाषा जरूर शिकायला हव्या व त्या भाषांचा आदर करावा. परंतु त्याचवेळी आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये असे जे आवाहन या माध्यमातून भाषातज्ज्ञ करीत आहेत. आता तर इंटरनेटमुळे जगभरातील भाषा एका क्लिकवर शिकता येणे शक्त झाले आहे. मात्र यात आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये हाच यातून संदेश दिला जात आहे. प्रत्येक देशात एका विशिष्ठ भाषा बोलल्या जाते. मात्र ती भाषा आपण देखील शिकू  शकतो ते देखील घर बसल्या. मात्र एखादी दुसरी मातृभाषा शिकण्याच्या नादात  आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करुन नये हे तरुणाईने लक्षात घेण्याची गरज आहे. आज फॅशन म्हणून अनेक विविध भाषा शिकण्याचा ट्रेन्ड आला आहे. माझी मातृभाषा ही सर्वांत चांगली मातृभाषा आहे असे म्हणून कोणी इतरांच्या मातृभाषेचा द्वेष करू नये. आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. आपल्या मातृभाषेचा विकास देखील आपल्याच हाती असतो. आजची तरुणाई आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण व विकासासाठी आपल्या मातृभाषेला ते कुठे पाहतात, तिचे स्वरक्षण व विकासासाठी या तरुणाईच्या डोक्यात काय कल्पना आहेत हे आपण तरुणाईकडून जाणून घेणार आहोत. मातृभाषेचा अभिमान आहेच आपण महाराष्ट्रात राहतो अन् मराठी आपली मातृभाषा आहे. याचा मला अभिमान आहे. मात्र आपल्याकडे हिंदीचा जास्त उपयोग केला जातो. आज सर्व भाषा इंटरनेटवर शिकता येतात. तेव्हा आपल्या वयक्तीक प्रोफाईल स्ट्राँग करण्यासाठी आपण इतर भाषा देखील शिकायला हव्यात. मात्र आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये. आज मराठी ही माझी मातृभाषा आता स्मार्टफोनवर देखील आल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. - विजय वटकर

Honor other languages ​​along with your mother tongue | मातृभाषेसोबतच इतर भाषांचा सन्मान करा

मातृभाषेसोबतच इतर भाषांचा सन्मान करा

्वांना आपली बोलीभाषा आवडीची असते, सर्वांनी तिच भाषा बोलावी असा प्रत्येकाचा समज असतो. म्हणूनच राज्यविस्तार करताना भाषांचा आग्रह धरला गेला. यामुळे अन्य भाषा नष्ट होत गेल्या. भाषेचा संबध केवळ भावनांशी नाही तर तो सांस्कृतीशी आहे. यातूनच 1999 पासून ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आणि जगभरात या दिवशी मातृभाषेच्या सन्मानाचे सोहळे साजरे व्हायला लागले. याला कारणही तसेच आहे. परकीय भाषा जरूर शिकायला हव्या व त्या भाषांचा आदर करावा. परंतु त्याचवेळी आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये असे जे आवाहन या माध्यमातून भाषातज्ज्ञ करीत आहेत. आता तर इंटरनेटमुळे जगभरातील भाषा एका क्लिकवर शिकता येणे शक्त झाले आहे. मात्र यात आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये हाच यातून संदेश दिला जात आहे. प्रत्येक देशात एका विशिष्ठ भाषा बोलल्या जाते. मात्र ती भाषा आपण देखील शिकू  शकतो ते देखील घर बसल्या. मात्र एखादी दुसरी मातृभाषा शिकण्याच्या नादात  आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करुन नये हे तरुणाईने लक्षात घेण्याची गरज आहे. आज फॅशन म्हणून अनेक विविध भाषा शिकण्याचा ट्रेन्ड आला आहे. माझी मातृभाषा ही सर्वांत चांगली मातृभाषा आहे असे म्हणून कोणी इतरांच्या मातृभाषेचा द्वेष करू नये. आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे. आपल्या मातृभाषेचा विकास देखील आपल्याच हाती असतो. आजची तरुणाई आपल्या मातृभाषेचे स्वरक्षण व विकासासाठी आपल्या मातृभाषेला ते कुठे पाहतात, तिचे स्वरक्षण व विकासासाठी या तरुणाईच्या डोक्यात काय कल्पना आहेत हे आपण तरुणाईकडून जाणून घेणार आहोत.

मातृभाषेचा अभिमान आहेच
आपण महाराष्ट्रात राहतो अन् मराठी आपली मातृभाषा आहे. याचा मला अभिमान आहे. मात्र आपल्याकडे हिंदीचा जास्त उपयोग केला जातो. आज सर्व भाषा इंटरनेटवर शिकता येतात. तेव्हा आपल्या वयक्तीक प्रोफाईल स्ट्राँग करण्यासाठी आपण इतर भाषा देखील शिकायला हव्यात. मात्र आपण आपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नये. आज मराठी ही माझी मातृभाषा आता स्मार्टफोनवर देखील आल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
- विजय वटकर

Web Title: Honor other languages ​​along with your mother tongue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.