हॉलिवूडचे भारत प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:34 IST2016-01-16T01:14:38+5:302016-02-06T09:34:23+5:30
हॉलिवूड स्टार भारतात गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूड स्टारचे भारत प्रेम चांगलेच वाढले आहे. धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक तसेच योग व आध्यात्मिक प्रसारासाठी हॉलिवूड स्टार भारतात येऊ लागले आहेत.

हॉलिवूडचे भारत प्रेम
ग ल्या काही वर्षांपासून हॉलिवूड स्टारचे भारत प्रेम चांगलेच वाढले आहे. धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक तसेच योग व आध्यात्मिक प्रसारासाठी हॉलिवूड स्टार भारतात येऊ लागले आहेत. येथील संस्कृती त्यांना भावत असून, काहींनी त्याचे अनुकरण करण्यास देखील सुरुवात केली आहे. रैंबो आणि रॉकी सिरीजच्या चित्रपटातील प्रसिद्ध सिलवेस्टर स्टेलोन गेल्या तीन वर्षांपासून येथील आध्यात्मिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी सतत भारतात येत आहे.
जेम्स बॉँड 'स्पेक्टर'
जेम्स बॉँड सिरीजचा 'स्पेक्टर' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. तुफान अँक्शन आणि भयानक कारनाम्यांसाठी प्रसिद्ध असलेला बॉँड सिरीजचा हा २४ वा चित्रपट आहे. स्पेक्टर हा चित्रपट आंतकवादावर आधारित असून, इतर चित्रपटांच्या तुलनेत यात अँक्शनची धमाल जास्त आहे. स्पेक्टर भारतात हिंदी, तामिळ, तेलगु भाषांमध्ये डब करण्यात आले आहे. या चित्रपटाचा प्रिमियर २६ ऑक्टोंबर रोजी रिलिज करण्यात आला आहे.
अँँजेलिनाला अवॉर्ड
सुपरस्टार अँँजेलिना जोली हिला 'डब्ल्यूएसजे मॅगजीन इनोवेटर अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले. यावेळी अँँजेलिनाने तिची दिवंगत आई, निर्माता मार्शलीन बट्ररेंड, तिची सहा मुले आणि पती ब्रॅड पिट यांचे आभार मानले. जेव्हा मी लहान होती, तेव्हा माझी आई मला नेहमी सांगायची की, कुठलेही काम करताना नेहमी मनाचे ऐकायचे. जेव्हा मी दुखी होत असे तेव्हा ती मला जवळ घेऊन माझ्या डोळ्यांमध्ये बघायची, अन् चिंता करू नको असे म्हणून माझी समजूत काढायची.