​हिटलरच्या मूर्तिचा 114 कोटींमध्ये लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 16:33 IST2016-05-10T11:03:37+5:302016-05-10T16:33:37+5:30

हिटलरच्या मूर्तिला ‘ख्रिस्टिज्’ या संस्थेने केलेल्या लिलावात 17.2 मिलियन डॉलर्स (114 कोटी रु.) एवढी किंमत मिळाली आहे.

Hitler's Statue Auctioned 114 Crore | ​हिटलरच्या मूर्तिचा 114 कोटींमध्ये लिलाव

​हिटलरच्या मूर्तिचा 114 कोटींमध्ये लिलाव

सºया महायुद्धाचा क्रूरकर्मा अ‍ॅडॉल्फ हिटलरचे नाव घेतले की, आजही आठवतो मानव इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार. जग जिंकण्याच्या इर्ष्येने पेटलेल्या हिटलरच्या अतिमहत्त्वकांक्षेचे सर्व मानवजातीला परिणाम भोगावे लागले.

त्यामुळे ‘हिटलर’ हे नाव ‘टॅबू’ अर्थातच वर्ज्य झाले. परंतु असे असूनही त्याच्याविषयी आकर्षण आजही कायम आहे.

गुडघ्यावर बसलेल्या हिटलरच्या मूर्तिला ‘ख्रिस्टिज्’ या संस्थेने केलेल्या लिलावात 17.2 मिलियन डॉलर्स (114 कोटी रु.) एवढी किंमत मिळाली आहे.

इटालियन आर्टिस्ट मॉरिझिओ कॅटेलन यांनी ही ‘हिम’ नावाची मूर्ति मेण व राळेपासून तयार केली आहे. लिलावापूर्वी या मूर्तिला 10 ते 15 मिलियन डॉलर्स किंमत मिळण्याची अपेक्षा होती.

यापूर्वी कॅटेलन यांनी तयार केलेल्या एका आर्टपिसला 7.9 मिलियन डॉलर्स किंमत मिळाली होती.

‘बाऊंड टू फेल’ या शीर्षकाखाली सुरू असलेल्या लिलावात एकूण 39 मॉर्डन व कंटेम्पररी कलावस्तूंचा सामावेश होता. कलाबाजाराचे आर्थिक अपयश व विस्ताराची जोखीम या विषयावर आधारित कलावस्तूंचा हा लिलाव होता.

लोईक गौझर यांनी माहिती दिली की, अशाप्रकारच्या ‘थीम’ लिलावातून त्याविषयाची चिकित्सा करणारे कलाप्रकार एकत्र आणण्याचा आमाचा हेतू असतो.

हिटलर मूर्तिच्या विक्रमी लिलावाबाबात ते म्हणाले, आमच्या अपेक्षापेक्षा नक्कीच जास्त प्रतिसाद मिळाला. खरं सांगायचे तर हिटलरच्या मूर्तिविषयी मी थोडा साशंक होतो. परंतु त्याच्याषियी लोकांमध्ये असणारे आकर्षण प्रचंड आहे. नशीबाने ते आकर्षण केवळ तो माणूस कसा होता हे जाणून घेण्याचे आहे, त्याच्या विचांरचे नाही.

Web Title: Hitler's Statue Auctioned 114 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.