​हायहिल्सवरून कळतात मुलींच्या महत्त्वाकांक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 21:07 IST2016-05-07T15:37:14+5:302016-05-07T21:07:14+5:30

मुलींच्या हायहिल्सच्या उंचीवरून त्यांच्या महत्त्वकांक्षेचा अंदाज बांधणे शक्य आहे.

Highhills learn girls' ambitions | ​हायहिल्सवरून कळतात मुलींच्या महत्त्वाकांक्षा

​हायहिल्सवरून कळतात मुलींच्या महत्त्वाकांक्षा

ले कपडे, अ‍ॅक्सेसरीज, गॅजेट्स यावरून समाजात आपली पत ओळखली जाते. ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून वापरण्यात येणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या व्यक्तीत्वाबद्दल खूप काही गोष्टी सांगून जातात. आता हायहिल्स सँडलचेच उदाहरण घ्या ना.

तुमची मैत्रीण किती महत्त्वाकांक्षी आहे हे जर माहीत करून घ्यायचे असेल तर तिच्या सँडलची टाच किती उंच आहे हे पाहा.

कारण एका संशोधनात असे दिसून आले की, मुलींच्या हायहिल्सच्या उंचीवरून त्यांच्या महत्त्वकांक्षेचा अंदाज बांधणे शक्य आहे. समाजात ‘स्वत:चा मान’ वाढविण्यासाठी हायहिल्स वापरण्यात येतात.

नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील प्राध्यापक आणि या संशोधनातील प्रमुख संशोधक कर्ट ग्रे यांनी माहिती दिली की, शहराच्या पॉश भागात जाताना मुली अधिक उंच हायहिल्स घालण्यास प्राधान्य देतात तर डाऊनमार्केट भागात जाताना याची त्या तसदीदेखील घेत नाही. इतर मुलींपेक्षा आपण वेगळे दिसावे म्हणून काही तरुणी हायहिल्स घालतात.

आपल्या आसपासचे उदाहरण द्यायचे तर, मॉलमध्ये जाताना मुली अधिक मेकअप आणि हायहिल्स घालतील; परंतु गल्लीतील बाजारात जायचे म्हटल्यावर दिसण्याकडे त्या एवढे लक्ष देणार नाही. 

इतरांपेक्षा आपण उठून दिसावे अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. समाजात आपल्याल मान मिळावा, चांगली वागणूक मिळावी या उद्देशाने आपण बाह्य घटकांची मदत घेत असतो, असे ग्रे म्हणाले.

Web Title: Highhills learn girls' ambitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.