​मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट ओपन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 15:27 IST2016-06-09T09:57:03+5:302016-06-09T15:27:03+5:30

मुंबईतील एका समाजसेवा शाखेच्या सतर्कतेने गोरेगावात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे.

High profile sex racket open in Mumbai | ​मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट ओपन

​मुंबईत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट ओपन

ंबईतील एका समाजसेवा शाखेच्या सतर्कतेने गोरेगावात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. सोशल नेटवर्किं गच्या माध्यमातून गोरेगाव परिसरात या सेक्स रॅकेटचा गोरखधंदा सुरू होता. 
 
पोलिसांनी गोरेगाव येथील एका आलीशान मॉल बाहेर कारवाई करीत २ टीव्ही अभिनेत्री, २ मॉडेल आणि २ दलालांना ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित मॉडेल आणि अभिनेत्रीचे फोटोही ताब्यात घेण्यात आले आहेत, हेच फोटो सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ग्राहकांना पाठवण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

यात अशा एका टीव्ही अभिनेत्रीचा समावेश आहे, जिने सावधान इंडिया या मालिकेत काम केले आहे.  या सेक्स रॅकेटमध्ये एका रात्रीसाठी ५० हजारांपासून १ लाख रुपये आकारले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. यात बडे व्यापारी, अधिकारी यांच्यासाठी हे सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: High profile sex racket open in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.