निरोगी आणि सुंदर डोळ्यांनी असे खुलवा सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:11 IST2016-02-05T06:41:10+5:302016-02-05T12:11:10+5:30
डोळे हे तुमच्या चेह-याचे सौंदर्य खुलवत असतात. अशा नाजूक डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. तरच ते निरोगी आणि सुंदर दिसतील. जाणून घ्या सुंदर डोळ्यांचे गुपित...निरोगी डोळ्यांसाठी जीवनसत्त्वा अ आहारात घेणे खूप आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा किंवा इतर अनेक विकार होऊ शकतात. यासाठी आपल्या आहारात ताज्या व हिरव्या पालेभाज्या, लोणी, दूध, टोमॅटो, गाजर, पपई यांचा समावेश केला पाहिजे. या पदाथार्मुळे डोळ्यांचा थकवादेखील कमी होण्यास मदत होते.सध्या अनेकांना तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून काम करावे लागते. पण अशा कामामुळे डोळ्यांवरचा ताण वाढू शकतो. हा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ ब्रेक घेतला पाहिजे. जीवनसत्त्वाचा अभाव, पोषक पदार्थांचा असमतोल यामुळेही काळी वतुर्ळे येतात. अनियमित जेवण, झोप, ताणतणाव, मानसिक अस्वस्थता यामुळेही वतुर्ळे येऊ शकतात. जीवनशैलीत बदल करुन आरोग्याची काळजी घ्या.

निरोगी आणि सुंदर डोळ्यांनी असे खुलवा सौंदर्य
ोळे हे तुमच्या चेह-याचे सौंदर्य खुलवत असतात. अशा नाजूक डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. तरच ते निरोगी आणि सुंदर दिसतील. जाणून घ्या सुंदर डोळ्यांचे गुपित...निरोगी डोळ्यांसाठी जीवनसत्त्वा अ आहारात घेणे खूप आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा किंवा इतर अनेक विकार होऊ शकतात. यासाठी आपल्या आहारात ताज्या व हिरव्या पालेभाज्या, लोणी, दूध, टोमॅटो, गाजर, पपई यांचा समावेश केला पाहिजे. या पदाथार्मुळे डोळ्यांचा थकवादेखील कमी होण्यास मदत होते.सध्या अनेकांना तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून काम करावे लागते. पण अशा कामामुळे डोळ्यांवरचा ताण वाढू शकतो. हा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ ब्रेक घेतला पाहिजे. जीवनसत्त्वाचा अभाव, पोषक पदार्थांचा असमतोल यामुळेही काळी वतुर्ळे येतात. अनियमित जेवण, झोप, ताणतणाव, मानसिक अस्वस्थता यामुळेही वतुर्ळे येऊ शकतात. जीवनशैलीत बदल करुन आरोग्याची काळजी घ्या.