आपण फेसबुकवरुन अद्यापही ‘या’ ७ गोष्टी हटविल्या नाहीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 12:26 IST2017-04-26T06:56:07+5:302017-04-26T12:26:07+5:30
सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी शेअर कराव्या आणि कोणत्या गोष्टी करु नये याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया अशाच काही गोष्टींविषयी ज्या सोशल मीडियावरून त्वरित हटविल्या पाहिजे.
.jpg)
आपण फेसबुकवरुन अद्यापही ‘या’ ७ गोष्टी हटविल्या नाहीत का?
सोशल मीडिया आज प्रत्येकाच्या आयुष्याचा एक घटकच बनला आहे. सोशल मीडियाद्वारे आपण आपल्या आयुष्यातील काही महत्त्वपुर्ण क्षण लोकांपर्यंत पोहचवित असतो. विशेष म्हणजे सोशल शेअरिंगची सवय लावण्यात फेसबुकचा मोठा सहभाग आहे. सोशल मीडियावर मात्र कोणत्या गोष्टी शेअर कराव्या आणि कोणत्या गोष्टी करु नये याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. आज आम्ही आपणास अशाच काही गोष्टींविषयी माहिती देत आहोत ज्या सोशल मीडियावरून त्वरित हटविल्या पाहिजे.
* फोन नंबर
आजच्या काळात आपण कदापी ही अपेक्षा करु नये की, कोणती मुलगी किंवा मुलगा ज्याला आपण पसंत करतो, तो आपला नंबर पाहून मॅसेज किंवा कॉल करेल. आपण शेअर केलेल्या मोबाइल नंबरचा दुरुपयोग होऊ शकतो. आजपासून सहा वर्षाअगोदर फेसबुकच्या सांगण्यावरुन मोबाइल नंबर आवश्यक होता, मात्र आता याची आवश्यकता नाही. यासाठी फेसबुकच्या प्रोफाइल मधून फोन नंबर हटविणेच योग्य आहे.
* ड्रंक फोटो
सोशल मीडियावर सहसा लोक नाइटआउट म्हणजे पब, पाटी आदींचे फोटो शेअर करतात, मात्र आपणास हे माहित असावे की, फेसबुकच्या आपल्या प्रायव्हसी सेटिंगला हॅकदेखील केले जाऊ शकते. अशातच आपले इंटरनेट सेवी पॅरेंट्सने हे फोटो पाहिले तर तेदेखील नाराज होऊ शकतात. बºयाच कंपन्या एंप्लॉयीला जॉब देण्याअगोदर सोशल मीडियावर त्यांचे बॅकग्राउंड चेक करतात. यासाठी असे फोटो कदापी शेअर करु नये.
* जन्म तारीख
सोशल मीडियावर आपल्या जन्म तारखेची गरज फक्त ‘बर्थडे’ ग्रीटिंगसाठी असते. मात्र आपल्या या जन्म तारखेसोबतच आपल्या नावाचा आणि पत्त्याचा दुरुपयोग करु शकतो.
* लोकेशन
फेसबुकवर सहसा लोक प्रवास करताना लोकेशन शेअर करतात. मात्र हे अयोग्य आहे. याचादेखील दुरुपयोग होऊ शकतो.
* एअरपोर्ट आणि हॉलिडे फोटो
सहसा लोक फेसबुकवर एअरपोर्ट आणि हॉलिडे एन्जॉयचे फ ोटो मित्रांना चिडविण्यासाठी शेअर करतात. विशेष म्हणजे आपण शेअर केलेले हे फोटो प्रत्येकजण पाहत असतो. यामुळेच चोरांना एक अंदाज येतो आणि त्यांना आपल्या घरात चोरीचे अप्रत्यक्षपणे आमंत्रणच देत असतो.
* बॉस
विशेषत: फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमधून आपल्या बॉसला बाहेर ठेवणेच फायद्याचे असते. ट्विटर, लिंक्डइनवर आपल्या बॉसला लिस्टमध्ये सहभागी करु शकता, मात्र फेसबुकवर कदापी नव्हे. कारण असे बरेच किस्से जे फक्त आपल्या जवळच्या मित्राला माहित असतात, जे तो कमेंट्सने व्यक्त करत असतो शिवाय आपणही काही व्यक्तिगत ओपिनियन शेअर करीत असतो, ज्यामुळे आपण जॉब गमवू शकतो.
* एक्स गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडचे फोटो
सोशल मीडियावर एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला असेल तर त्वरित डिलेट करा. यामुळे फक्त आपल्या भविष्यावरच परिणाम होणार नाही तर आपले मित्रदेखील आपल्याबाबती नको तो विचार करतील.
Also Read : ALERT : सतत फेसबुक पाहताय? सावधान!