/>हॅरी पॉटरन गेल्या दीड दशकांपासून अबालवृद्धांना वेड लावेलेले आहे. त्यांची जादूई दुनिया, शाळा, अँडव्हेंचर सगळ्यांनाच आवडतात. कधीतरी आपणही हॅरी पॉटरच्या विश्वात जावे असे अनेकांना वाटते. अशा लोकांसाठी खूश खबर आहे. 'वॉर्नर ब्रदर स्टुडियो टूर'तर्फे सर्व फॅन्सना या ख्रिसमसला हॅरी पॉटरच्या 'ग्रेट हॉल'मध्ये जंगी पार्टी दिली जाणार आहे. हॉगवर्टस्च्या प्रसिद्ध 'ग्रेट हॉल'मधील लांबच्या लांब टेबलवर जेवण्याची संधी यावेळी मिळणार आहे. हॅरी पॉटर फिल्म सिरिजच्या पहिल्या भागातील सेटवर हे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पाहुण्यांचे स्वागत 'कॅनापीज' देऊन करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाला चित्रपटात वापरण्यात आलेल्या 'जादुई' छडीची प्रतिकृती देण्यात येणार आहे. पुडिंग, बटरबीअर असा खास ख्रिसमस डिनरचा प्लॅन आहे.