हरभजनच्या रिसेप्शनला चार चाँद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:05 IST2016-01-16T01:15:24+5:302016-02-13T04:05:23+5:30
हरभजनच्या रिसेप्शनला चार चाँद क्रिकेटपटू हरभजनसिंगच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडची बडी स्टार मंडळी, क्रिकेट जगतातील दिग्गज यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीने चार चॉँद लागले.

हरभजनच्या रिसेप्शनला चार चाँद
क रिकेटपटू हरभजनसिंगच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूडची बडी स्टार मंडळी, क्रिकेट जगतातील दिग्गज यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीने चार चॉँद लागले. हरभजनच्या रिसेप्शनला बॉलिवूड, क्रिकेटजगत, उद्योगजगत तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती असल्याने दिल्लीतल्या पॉश एरियातील सिटी हॉटेलच्या परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही उशिरा हजेरी लावत वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. मनमोहन सिंग सपत्नीक आले होते. भज्जीचे एकेकाळचे सहकारी माजी कर्णधार अनिल कुंबळे, भारतीय क्रिकेट संघाचा मार्गदर्शक संचालक रवी शास्त्री, पंजाबचे माजी पोलीस महासंचालक के.पी.एस. गिल, कॉँग्रेसचे खासदार व आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला हेही उपस्थित होते. भारतीय संघातील मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे क्रिकेटपटू त्यांच्या सौभाग्यवतींसह या सोहळयात सहभागी झाले होते. माजी कर्णधार कपिलदेव, मुनाफ पटेल यांचीही उपस्थिती होती.