Happy Birthday : प्रख्यात अभिनेत्री, प्रतिभावंत कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस, पाहुयात तिचे काही ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 14:41 IST2019-10-13T14:39:54+5:302019-10-13T14:41:00+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पृहा जोशीचा आज वाढदिवस. अनेकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या स्पृहाने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत.

Happy Birthday : प्रख्यात अभिनेत्री, प्रतिभावंत कवयित्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस, पाहुयात तिचे काही ग्लॅमरस फोटो
मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पृहा जोशीचा आज वाढदिवस. अनेकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या स्पृहाने आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली आहेत. 'मोरया', 'पैसा पैसा' यासह विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. नुकताच तिचा 'बाबा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला असून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. एवढचं नाहीतर छोट्या पडद्यावरील मालिकांमधूनही स्पृहाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. स्पृहाची चाहत्यांमध्ये अभिनेत्री म्हणून ओळख आहेच पण त्याव्यतरिक्त स्पृहा एक उत्तम निवेदिका आणि कवियत्रीदेखील आहे. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी 'कुसुमाग्रज' हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
स्पृहा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. तसेच ती आपले ग्लॅमरस फोटोही आपल्या अकाउंटवरून शेअर करत असते. तिच्या वाढदिवसानिमित्त पाहूयात स्पृहाचे काही क्लासी आणि ग्लॅमर्स फोटो...