गुलिगन : लाखो अँड्रॉईड यूजर्सला गंडवणारा व्हायरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:44 IST2016-12-01T16:44:10+5:302016-12-01T16:44:10+5:30
वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनविण्यात आलेल्या ‘गुलिगन’ या सॉफ्टेवेअरने लाखो गुगल यूजर्सच्या अकांउटचा ताबा मिळवून प्रचंड प्रमाणात डेटा चोरी केली.

गुलिगन : लाखो अँड्रॉईड यूजर्सला गंडवणारा व्हायरस
म ्यंतरी लाखो अँड्रॉईड यूजर्सना एका व्हायरसचा जबर फटका बसला. वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी बनविण्यात आलेल्या ‘गुलिगन’ या सॉफ्टेवेअरने लाखो गुगल यूजर्सच्या अकांउटचा ताबा मिळवून प्रचंड प्रमाणात डेटा चोरी केली.
‘चेक पॉर्इंट सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीज्’च्या रिपोर्टनुसार, अँड्राईड ४.० आणि ५.० व्हर्जन वापरणाऱ्या मोबाबईल युजर्सना ‘गुलिगन’ने टार्गेट केले होते. गुगलची आॅपरेटिंग सिस्टिम वापरणाऱ्या एकुण मोबाईलधारकांपैकी ७४ टक्के यूजर्सचा यामध्ये समावेश होता.
या व्हायरस अॅटॅकमध्ये लोकांचे ईमेल अॅड्रेस, मोबाईलमध्ये सेव्ह केलेला आॅथेंटिकेशन डेटा तसेच जीमेल, गुगल फोटोज्, गुगल डॉक्स आणि इतर सर्व्हिसेसमधील संवेदनशील माहिती चोरण्यात आली.
‘अत्यंत आधुनिक सायबलर हल्ला असे या अॅटॅकचे वर्णन करता येईल. जगभरातील लाखो लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्यात हॅकर्सना यश आले. विशेष म्हणजे हॅकर्स आता जूने व्हर्जन वापरणाऱ्या मोबाईल यूजर्सना टार्गेट करीत आहेत, असे चेक पॉर्इंटचा मोबाईल उत्पादनाचा प्रमुख मायकल शौलोव्हने सांगितले.
![]()
अँड्रॉईड मॅलवेअर
सर्वप्रथम गेल्या वर्षी ‘गुलिगन’ व्हायरसचा कोड ‘चेक पॉर्इंट’ने शोधला होता. त्याचेच नवे रुप यावर्षी आॅगस्ट महिन्यात दिसून आले. दर दिवशी सुमारे १३ हजार स्मार्टफोन्समध्ये हा व्हायरस पसरायचा.
प्रामुख्याने आशिया खंडातील मोबाईल यूजर्सना याचा सर्वाधिक फटका बसला. युरोपमधील नऊ टक्के अँड्रॉईड यूजर्सचादेखील यामध्ये समावेश आहे.
‘गुलिगन’युक्त अॅप्स किंवा फिशिंग लिंक्सवर क्लिक केले असता हा व्हायरस मोबाईलमध्ये शिरतो. त्यानंतर मग हॅकर्स तुमच्या फोनचा संपूर्ण ताबा मिळवतात. त्यानुसार मग ते लपून अॅप डाऊनलोड करून किंवा त्यांना चुकीची रेटिंग देऊन पैसे कमवतात.
यूजर्सची वैयक्तिक माहितीसुद्धा विक ली जाते. चेक पॉर्इंटने याची माहिती गुगलला दिलेली असून कंपनीने लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले आहे.