GUDI PADWA 2017 : काही खास मॅसेज तुमच्या आवडत्या व्यक्तींसाठी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 11:46 IST2017-03-28T06:16:52+5:302017-03-28T11:46:52+5:30
गुढीपाडवा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी लाडक्यांसाठी...
.jpg)
GUDI PADWA 2017 : काही खास मॅसेज तुमच्या आवडत्या व्यक्तींसाठी !
नवचैतन्याचा, उत्साहाचा, जल्लोषाचा असा हा गुढीपाडवा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. त्यातच सध्या आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आपण फोन किंवा एसएमएस किंवा वॉटस अॅपच्याव्दारे शुभेच्छा देतो. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी लाडक्यांसाठी...
शिखरे उत्कषार्ची सर तुम्ही करत राहावी!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी!!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे!!
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे!!
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी,
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला, पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,
शांती,
समृद्धी!!!
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा !
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा !
जल्लोष नववर्षाचा
मराठी अस्मितेचा
हिंदू संस्कृतीचा
सण उत्साहाचा
मराठी मनाचा
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
माज्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!
गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!