GUDI PADWA 2017 : यावर्षी गुढीपाडवा दोन दिवसाचा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 13:05 IST2017-03-28T07:22:36+5:302017-03-28T13:05:02+5:30
महाराष्ट्रातील लोकं आपल्या पंचांगानुसार २८ मार्च तर काही हिंदू हा सण २९ मार्चला साजरा करतील.
.jpg)
GUDI PADWA 2017 : यावर्षी गुढीपाडवा दोन दिवसाचा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी !
यावर्षी चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमी सारखेच गुढीपाढवा हा सण दोन वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील लोकं आपल्या पंचांगानुसार २८ मार्च तर काही हिंदू हा सण २९ मार्चला साजरा करतील. तिथी आणि अमावस्येची समाप्ती तसेच प्रतिपदेला वेगवेगळ्या वेळेची मान्यता असल्याने हा पर्व दोन दिवस साजरा होणार आहे. यामुळे बहुतेक ठिकाणी आठ दिवसाचाच नवरात्रोत्सव साजरा करीत आहेत. पंचांगाची वेगवेगळी गणनामुळे रामनवमीदेखील यावेळी दोन दिवस साजरी केली जाणार आहे.
पंडितांच्या मतानुसार जर २८ तारखेला हिंदू नववर्ष सुरू झाले तर वर्षाचा राजा मंगळ असेल आणि २९ सुरू झाले तर वर्षाचा राजा बुध असेल. पारंपारिक पंचांग मानणारे २९ ला गुढीपाढवा साजरा करतील.असे म्हटले जाते की, गुढीपाडवाच्या दिवशी विधीनुसार पूजा-पाठ केल्याने आपल्या सर्व आकांशा पुर्ण होतात शिवाय कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही. सोबतच घरात सुख-शांती आणि समृद्धी येते.
अशी करा पूजा
यादिवशी ब्रह्म मुहूर्तात उठून नेहमीचे कामे बाजूला सारुन आपल्या शरीरावर बेसन आणि तेलाचे उटणे लावून स्नान करावे. त्यांनतर हातात गंध, अक्षत, फुले आणि पाणी घेऊन भगवान ब्रह्माच्या मंत्रांचा जाप करून पूजा करावी. असे केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.
पूजेचा शुभ मुहूर्त
यावेळी गुढीपाडवेच्या पूजेचा शुभ मुहूर्त २८ मार्च सकाळी ८:२६ पासून २९ मार्च रोजी ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत असेल. हिंदू पंचांगानुसार अमावस्या सकाळी ८ वाजून २७ मिनिटाने समाप्त होईल. त्यानंतर त्यावेळेपासूनच पाडवा दिवसाची सुरूवात होईल. यादिवशी महाराष्टÑात सर्व लोक आपल्या घरात गुढीची स्थापना करतात. या गुढीला लोक भगवान ब्रम्हाच्या झेंड्याच्या रुपात पाहत असतात.