​अतिसडपातळ मॉडेलमुळे ‘गुच्ची’ गोत्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 21:44 IST2016-04-09T04:44:16+5:302016-04-08T21:44:16+5:30

इटालियन फॅशन ब्रँउ ‘गुच्ची’ अशाच एका जाहीरातीमुळे अडचणीत आली आहे.

'Gucci' Cottage due to the overwhelming model | ​अतिसडपातळ मॉडेलमुळे ‘गुच्ची’ गोत्यात

​अतिसडपातळ मॉडेलमुळे ‘गुच्ची’ गोत्यात

शन म्हटले की, कमनीय बांध्याच्या मॉॅडेल्स नजरे समोर येतात. जगातील कोणताही ब्रँड घ्या, त्यांच्या जाहीरातीमध्ये विश्वास बसणार एवढ्या सडपातळ असतात. इटालियन फॅशन ब्रँउ ‘गुच्ची’ अशाच एका जाहीरातीमुळे अडचणीत आली आहे.

‘गुच्ची’ने गेल्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या एका जाहीरातमध्ये दाखवलेली मॉडेल ही गरजेपेक्षा अतिजास्त सडपातळ असल्याची तक्रार करण्यात आली होती. अशी जाहीरात करून महिलांच्या सौंदर्याप्रती विनाकारण चुकीचा संदेश जात असल्यामुळे ‘गुच्ची’ जबाबदार जाहीराती संबंधीच्या नियमाचा भंग झाल्याचा निष्कर्ष ‘अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स आॅथोरिटी’ने (एएसए) दिला आहे.

जाहीरातीमध्ये एक मुलगी सोफ्यावर बसलेली असून दुसरी मुलगी भिंतीला टेकून लाँग प्रिंटेड ड्रेस घालून उभी आहे. भिंताला टेकून उभ्या असलेल्या मुली अतिशय डार्क मेकअप करण्यात आलेला आहे.

एएसए‘ने म्हटले आहे की, या मॉडेलच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यापाशी असणाºया डार्क मेकअपमुळे ती मुलगी निस्तेज, निराश दिसत आहे. तिचे पोट आणि हात तिच्या डोक्याच्या आकाराच्या प्रमाणातही नाहीत. 

Gucci Model

‘गुच्ची’ने जाहीरातीचे समर्थन करत म्हटले आहे की, एका डान्स पार्टीमधील ते दृश्य असून प्रौढ, समंजस प्रेक्षकांसाठी ही जाहीरात तयार करण्यात आली आहे. ती मॉडेल केवळ बारीक आहे. त्यामागे दुसरा कोणताही हेतू नाही.

Web Title: 'Gucci' Cottage due to the overwhelming model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.