शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

'ग्रे हेअर्स'चा फॅशन वर्ल्डमध्ये धुमाकूळ; केसांच्या 'या' रंगाचीही सेलिब्रिटींमध्ये चलती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 17:24 IST

कधी कोणती फॅशन ट्रेन्डमध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यातच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे जुळलेलं समीकरण. एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये आहे आणि बॉलिवूडकरांनी ती डोक्यावर घेतली नाही म्हणजे अशक्यच.

कधी कोणती फॅशन ट्रेन्डमध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यातच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे जुळलेलं समीकरण. एखादी फॅशन ट्रेन्डमध्ये आहे आणि बॉलिवूडकरांनी ती डोक्यावर घेतली नाही म्हणजे अशक्यच. अशातच केसांची एक फॅशन ट्रेन्डमध्ये आहे. बॉलिवूडकरांसह हॉलिवूडकरांनाही या फॅशनचं वेड लागलं आहे. सध्या सेलिब्रिटींमध्ये केसांना कलर करण्याच्या ट्रेन्डची चलती आहे. आता तुम्ही विचार करल की, यामध्ये काय नवीन? अनेक सेलिब्रिटी तर वेळोवेळी केसांवर वेगवेगळे रंग ट्राय करताना दिसत असतात. पण सध्या प्लॅटिनम रंग ट्रेन्डमध्ये आहे. अनेक सेलिब्रिटींना या रंगाने भूरळ घातली असून आपला लूक वेगळा करण्यासाठी सेलिब्रिटी या रंगाचा आधार घेत आहेत. 

ग्रे रंगाच्या केसांमध्ये लीझा हेडन इंटरनेटवर झळकली

आपल्या हॉट फोटोंमुळे नेहमी चर्चेत राहणारी लीझा हेडन यावेळी आपल्या लूकमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान लीझाने आपले सगळे केस कलर केले असून ती सध्या प्लॅटिनम रंगाच्या केसांमध्ये दिसून येत आहे. लीझाचा हा लूक अनेकांना आवडत आहे तर अनेक चाहते तिच्या य लूकवर टिका करत आहेत. तर काही लोकं लीझाची गेम्स ऑफ थ्रोनमधील डेनेरेससोबत तुलना करत आहेत. लीझाच्या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे लीझाला किम कार्दाशिया सुद्धा म्हटलं जात आहे. तर काही लोकांना लीझाचा हा लूक लेडी गागाप्रमाणे दिसत आहे.

प्लॅटिनम रंगाची अनेक सेलिब्रिटींना भूरळ

लीझा हेडनप्रमाणे दिग्दर्शक करण जोहरनेही आपल्या केसांना कलर केला आहे. अनेक लोकांना हा ट्रेन्ड आवडलेला नाही पण तरिदेखील या ट्रेन्डची चलती पाहायला मिळते. याला प्लॅटिनम आणि सिल्वर हेअर असंही म्हटलं जातं. जर यासोबत तुम्ही मॅचिंग ड्रेसही घातलात तर यामुळे एक हटके लूक मिळण्यास मदत होईल.

हॉलिवूडकरांनाही भावला प्लॅटिनम हेअर ट्रेन्ड

हॉलिवूड सेलिब्रिटींनाही ग्रे हेअरसोबतच प्लॅटिनम हेअरच्या ट्रेन्डनेही भूरळ घातली आहे. जस्टिन बीबर, कायली जेनर यांसारखे हॉलिवूड सेलिब्रिटी या ट्रेन्डमध्ये सामिल झाले आहेत. 

वेवी आणि लांब केसांवर सुंदर दिसतो हा रंग

जर तुम्ही हा रंग वेवी आणि लांब केसांवर ट्राय केलात तर तुम्हाला स्टायलिश लूक मिळण्यास मदत होईल. फक्त महिलांमध्येच नाही तर पुरूषांमध्येही हा ट्रेन्ड व्हायरल होत आहे. 

टॅग्स :fashionफॅशनKaran Joharकरण जोहरHollywoodहॉलिवूडbollywoodबॉलिवूड