​ग्रेट फोटो : ब्रिटिश राजघराण्याच्या चार पिढ्या एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 20:43 IST2016-04-21T15:13:33+5:302016-04-21T20:43:33+5:30

रॉयल मेलने एक स्पेशल स्टॅम्प तयार केला असून त्यात महाराणी सोबत त्यांचा पणतू प्रिन्स जॉर्जदेखील आहे.

Great photo: Four generations of the British dynasty gathered together | ​ग्रेट फोटो : ब्रिटिश राजघराण्याच्या चार पिढ्या एकत्र

​ग्रेट फोटो : ब्रिटिश राजघराण्याच्या चार पिढ्या एकत्र

ग्लंडच्या रॉयल मेलने ब्रिटिश राजघराण्यातील चार पिढ्या एकत्र असलेला एका फोटोग्राफ प्रकाशित केला आहे. इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त रॉयल मेलने एक स्पेशल स्टॅम्प तयार केला असून त्यात महाराणी सोबत त्यांचा पणतू प्रिन्स जॉर्जदेखील आहे.

बकिंगहॅम पॅलेसच्या व्हाईट ड्रॉविंग रूममध्ये घेण्यात आलेल्या एका फोटोमध्ये राजघराण्याचे तीन वंशज - प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स जॉर्ज - महाराणी  एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबत दिसतात. राणीच्या नव्वदव्या वाढदिवसानिमित्त विंडसर फॅमिलीचा फोटो असलेले विशेष दहा स्टॅम्पस प्रकाशित करण्यात आले आहेत.

फोटोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतो तो छोटासा प्रिन्स जॉर्ज. येत्या जुलै महिन्यात तो तीन वर्षांचा होणार आहे. पणजी आणि वडिलांचे मध्ये एका ब्लॉकवर उभा असलेल्या प्रिन्सचे निरागस हास्य मोहून टाकणारे आहे.

या दहापैकी सहा स्टॅम्पद्वारे महाराणीचे जीवनकार्य दर्शविण्यात आलेले आहे. त्यामध्ये गोल्डन जुबलीनिमित्त 1977 ला न्यूझीलंडला दिलेली भेट, 1996 साली नेल्सन मंडेला सोबतचा फोटो असे अनेक प्रसंग दाखविण्यात आले आहेत. प्रिंन्स फिलिप यांच्या पाचव्या जन्मशताब्दीनिमित्त महाराणी विंडसर कॅसल जवळ असणाºया रॉयल मेल आॅफिसला भेटदेखील देणार आहे.

Web Title: Great photo: Four generations of the British dynasty gathered together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.