गुगल कारची बसला धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 08:16 IST2016-03-02T15:16:25+5:302016-03-02T08:16:25+5:30
गुगलची स्वयंचलित कारने सिलिकॉन व्हॅली रोडवर एका बसला धडक दिली आहे.

गुगल कारची बसला धडक
स पूर्णत: स्वयंचलित कारची निर्मिती करण्याच्या गुगलच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे. गुगलची स्वयंचलित कारने सिलिकॉन व्हॅली रोडवर एका बसला धडक दिली आहे. चाचण्यां दरम्यान अनेक समस्यांना सामोरे जावे लागणाऱ्या गुगलच्या ‘सेल्फ ड्राईव्हिंग कार’ प्रोजेक्टमध्ये प्रथमच अशा प्रकारचा अपघात झाला आहे.
१४ फ्रेबुवारी गुगल मुख्यालयाबाहरे ही घटना घडली. गुगलने अशंत: चूक मान्य करत सांगितले की, लेक्सस एसयूव्हीमधील सेन्सर्स आणि कॅमेऱ्याच्या गडबडीमुळे कार बसच्या एका बाजूला जाऊन धडकली. सुदैवाने हा फार मोठा अपघात नव्हता.
‘कॅलिफोर्निया डिपार्टमेंट आॅफ मोटर्स व्हेईकल्स’कडे सुपुर्द केलेल्या रिपोर्टमध्ये कंपनीने म्हटले की, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. चौकातून उजव्या बाजूला वळण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाºया बसला धडक बसली. अपघाताच्या वेळी कारचा वेग ताशी ३ किमी तर बस ताशी २४ किमी वेगाने धावत होती.
![sel driving car]()
कॅलिफोर्निया राज्याच्या कायद्यानुसार स्वयंचलित कारच्या चालकासाठी समोरच्या सीटवर बसणे अनिवार्य आहे. अपघाताच्या वेळी ड्राईव्हरने अंदाज बांधला की, बस बाजूने जाईल. त्यामुळे त्याने कारचे स्टेअरिंग व्हील हातात घेतलेच नाही.
Photo Source : Tech New Today