Good News : नोकिया ३३१० मिळण्याची तारीख जाहीर, किंमतही आहे आकर्षक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 15:33 IST2017-05-16T10:03:08+5:302017-05-16T15:33:08+5:30
नोकिया ३३१० लॉन्च होणार असल्याच्या बातम्या जेव्हा पासून झळकल्या आहेत तेव्हा पासून लोकं गूगलवर सर्च करीत आहेत की, हा मोबाइल कधी येतोय? मात्र आता आपणास जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, कारण आता नोकिया ३३१० मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Good News : नोकिया ३३१० मिळण्याची तारीख जाहीर, किंमतही आहे आकर्षक !
न किया ३३१० लॉन्च होणार असल्याच्या बातम्या जेव्हा पासून झळकल्या आहेत तेव्हा पासून लोकं गूगलवर सर्च करीत आहेत की, हा मोबाइल कधी येतोय? मात्र आता आपणास जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, कारण आता नोकिया ३३१० मिळण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शिवाय याची किंमतही सांगण्यात आली आहे.
हा मोबाइल १८ मे म्हणजेच येत्या दोन दिवसातच मिळायला सुरुवात होणार आहे. नव्या अवतारात आलेला हा नोकिया ३३१० भारतातील सर्व मोबाइल स्टोर्सवर उपलब्ध असेल.
विशेष म्हणजे या मोबाइलची किंमत तेवढीच असेल जेवढा मोबाइलचा मॉडल नंबर आहे. म्हणजेच ३३१० रुपये.
नव्या फीचर्ससह उपलब्ध होणारा हा मोबाइल चार रंगात म्हणजेच लाल, गडद निळा, पिवळा आणि करडा या रंगात मिळणार आहे. विशेष म्हणजे हा फोन ड्यूल सिम आणि ‘२.५ जी’ देखील असणार आहे. शिवाय ब्लुटूथ, युएसबी कनेक्ट, १६ जीबी इंटरनल आणि ३२ जीबी एक्स्टर्नल स्टोरेज आदी सुविधा असणार आहेत.