GOOD NEWS : गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 11:34 IST2017-03-25T06:00:55+5:302017-03-25T11:34:42+5:30
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी असून गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शनाचा आनंद हवाई सफरीने घेता येणार आहे.
.jpg)
GOOD NEWS : गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शन !
म ंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी असून गुढीपाडव्यापासून हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शनाचा आनंद हवाई सफरीने घेता येणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि पवनहंस यांनी नुकताच यासंदर्भात सामंजस्य करार केला असून मुंबई विद्यापीठातील हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने या जॉयराईडचा आनंद घेता येणार आहे.
तसे पाहिले तर मुंबईमध्ये लोकलने प्रवास करून कमी खर्चात मुंबई दर्शन करता येते मात्र हवाई सफरने प्रवास करणे काही औरच असते. पण यासाठी प्रत्येकी ३ हजार ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्यांना जरी ही सफर महागडी ठरणार असेल तरी या तिकिटावर विद्यार्थ्यांना दहा टक्के आणि सामाजिकदृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांना २५ टक्के सवलत असेल. ही हवाई सफर दररोज नाहीतर दर रविवारी आयोजित केली जाईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी दिली. त्यामुळे या हवाई सफरीला मुंबईकरांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.