Good News : जिओची डीटीएच सेवा लवकरच, सहा महिने फ्री टीव्ही चॅनेल्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 16:33 IST2017-04-05T11:03:50+5:302017-04-05T16:33:50+5:30
4जी मोबाइल नेटवर्क मार्केटमध्ये धमाल केल्यानंतर रिलायंस जिओ आता डीटीएस सर्विसमध्येही एन्ट्री करत आहे
.jpg)
Good News : जिओची डीटीएच सेवा लवकरच, सहा महिने फ्री टीव्ही चॅनेल्स !
4जी मोबाइल नेटवर्क मार्केटमध्ये धमाल केल्यानंतर रिलायंस जिओ आता डीटीएस सर्विसमध्येही एन्ट्री करत आहे. नुकतेच सोशल मीडियावर जिओ ‘आयपीटीव्ही’ सेट टॉप बॉक्सचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यानुसार आपल्या या सेट टॉप बॉक्सला कंपनी एप्रिलमध्ये लॉन्च करु शकते. विशेष म्हणजे जिओची ही डीटीएच सेवादेखील जिओ मोबाइल नेटवर्क सारखी स्वस्त असेल. या वृत्तानुसार असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे की, कंपनी काही महिन्यांसाठी ही सेवा फ्री करू शकते.
रिलायंस जिओ ‘आयपीटीव्ही’ सेट टॉप बॉक्सचे व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये एक निळ्या रंगाचा रिटेल बॉक्स दिसत आहे. यावर रिलायंस जिओे लोगोदेखील नजरेस पडत आहे. हा डिव्हाईस ‘आरजे-४५’ ईथरनेट पोर्टसोबत येऊ शकतो. यामुळे या ब्रॉडबॅँडला ‘एसटीबी’ सोबत कनेक्ट केला जाऊ शकतो. याद्वारे यूजर्स आपल्या टीव्हीत इंटरनेटदेखील चालवू शकतो, हा याचा फायदा होईल. पूढे जिओ डीटीएच सर्व्हिससाठी टॅरिफ प्लॅन जाहीर केले जातील.
जिओ सुरुवातीला आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डीटीएच सेवा सहा महिन्यापर्यंत फ्री देऊ शकते. या मागचे कारण म्हणजे जिओ मोबाइल सारखा यूजर्सला आपल्या ब्रॉडबॅँड सर्व्हिसमध्ये कन्व्हर्ट करू इच्छितो.