Good News : हे माहित आहे का? प्रत्येक एटीएमधारकास मिळते ५ लाखाचे विमा संरक्षण !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 13:11 IST2017-04-26T07:29:32+5:302017-04-26T13:11:52+5:30
या माहितीअभावी आपण आपल्या हक्काच्या विम्याचे पैसे बॅँकेकडे मागत नाहीत. विशेष म्हणजे बॅँकादेखील ही माहिती ग्राहकांपासून लपवून ठेवतात. जाणून घ्या कसे मिळवाल हक्काचे पैसे..!
.jpg)
Good News : हे माहित आहे का? प्रत्येक एटीएमधारकास मिळते ५ लाखाचे विमा संरक्षण !
आज बहुतेकांजवळ एटीएम आहे. आपणास फक्त एटीएमद्वारे पैशांची देवाण-घेवाण करणे एवढेच माहित आहे, मात्र प्रत्येक एटीएम धारकास तब्बल ५ लाखाचे विमा संरक्षण कार्ड घेतल्याबरोबर लगेच मिळते, हे माहित नसेल.
या माहितीअभावी आपण आपल्या हक्काच्या विम्याचे पैसे बॅँकेकडे मागत नाहीत. विशेष म्हणजे बॅँकादेखील ही माहिती ग्राहकांपासून लपवून ठेवतात. आज आम्ही आपणास याविषयी सविस्तर माहिती देत आहोत.
आपणाकडे ज्या बॅँकेचे एटीएम कार्ड असेल आपला अपघाती विमा त्या संबंधीत बॅँकेकडे तुम्ही काढला आहे, असे समजाच. हा विमा २५ हजारांपासून ५ लाखांपर्यंतचा असतो. ही योजना कित्येक वर्षांपासून सुरू आहे परंतु ९०-९५ टक्के लोकांना या योजनेची माहिती नाही.
काय आहे विमा प्रक्रिया?
कोणत्याही एटीएम धारकाचे अपघाती निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांनी पुढील २ ते ५ महिन्यात संबंधीत बॅँके त संपर्क साधावा.
* सदर विम्याची रक्कम मिळविण्यासाठी एक अर्ज बॅँकेत सादर करावा.
* सदर बॅँक विम्याची रक्कम देण्यापूर्वी संबंधीत व्यक्तिच्या मृत्युपूर्वी ४५ दिवसापर्यंत त्याच्या एटीएममधून कोणताही आर्थिक व्यवहार झाला नाही ना याची खात्री करते.
या योजनेचे हे आहेत फायदे
* योजनेनुसार, आंशिक अपंगत्वापासून ते मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई मिळते. यासाठी एटीएम धारकाला कोणत्याही स्वरुपात अतिरिक्त पैसे भरावे लागत नाहीत.
* जर तुमच्याकडे साधारण एटीएम असेल तर एक लाखांपर्यंतची नुकसान भरपाई तुमच्या कुटुंबीयांना मिळेल. जर मास्टर कार्ड असेल तर ही नुकसान भरपाई २ लाखांपर्यंत असू शकेल.
* सर्व वीजा कार्डांवर २ लाखांपर्यंत आणि मास्टर मित्र कार्डावर २५ हजार रुपयांचा विमा असतो. तर प्लॅटिनम कार्डावर २ लाख रुपये, मास्टर प्लॅटिनम कार्डावर ५ लाखांपर्यंतचा विमा तुम्हाला बँकेकडून मिळू शकतो.
* आंशिक अपंगत्वात जर एका पायाला किंवा हाताला दुखापत झाली असेल तर बँकेकडून ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकेल. दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले असल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळू शकते.
हे आहेत तुमचे हक्क
या योजनेची माहिती आपण संबंधीत बॅँकेत फोन करून खात्री करु शकता. याची माहिती देण्यास बँकेच्या कर्मचाऱ्यानी टाळाटाळ केल्यास तुम्ही याची तक्रार दाखल करू शकता. नुकसान भरपाई देण्यास बँकेनं नकार दिला तर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागू शकता.