​‘सोनेरी’ ताज महाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:37 IST2016-04-30T19:07:25+5:302016-05-01T00:37:25+5:30

दोन वेळा कॅन्सरला मात देणारी ऋतू भल्लाने ‘ताज महाल’ सोनेरी रंगात प्रकाशमान करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

'Golden' Taj Mahal | ​‘सोनेरी’ ताज महाल

​‘सोनेरी’ ताज महाल

रेमाचे सर्वोच्च प्रतीक असणारा पांढरा शुभ्र ‘ताज महाल’ आता ‘सोनेरी’ रंगात न्हाऊन निघणार आहे. दोन वेळा कॅन्सरला मात देणारी ऋतू भल्लाने ‘ताज महाल’ सोनेरी रंगात प्रकाशमान करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

25 वर्षीय ऋतूने लहान मुलांच्या कॅन्सर संदर्भात भारतात जागरुकता वाढविण्याच्या हेतूने  ‘सोनेरी ताज महाल’ मोहिम सुरू केली आहे.

‘आम्ही जगाला दाखवून देऊ इच्छितो की, आपला देश लहान मुलांच्या कॅन्सरसंबधी कृतीशील आहे. सोनेरी रंग हा कॅन्सर जागृतीचा रंग आहे. त्याला समर्थन म्हणून कॅन्सरशी लढा दिलेल्या सुमारे 2.5 लाख लोकांच्या सह्या आम्ही गोळा करणार आहोत, असे ऋतू म्हणाली.

ती ‘किडस्कॅन कनेक्ट’ ग्रुपची सदस्य असून ती ‘गर्ल चाईल्ड अ‍ॅम्बेसेडर’सुद्धा आहे. कॅन्सरशी लढा देऊन आयुष्याला मिठी मारणाºया मुलांच्या धैर्याचे, शक्तीला सलाम करण्यासठी ताज महाल सोनेरी रंगात प्रकाशमान करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.

जगभरातून पर्यटक ताज महाल पाहण्यासाठी भारतात येतात. ‘सोनेरी ताज महाल’ मोहिमेमुळे चाईल्ड कॅन्सरबद्दल जागृती वाढण्यास खूप मदत होईल. जगातील कॅन्सरग्रस्त लहान मुलांपैकी 20 टक्के मुलं भारतात आहे. परंतु त्यातुलनेत केवळ 30-50 टक्के रुग्णांवरच इलाज होतो.

Web Title: 'Golden' Taj Mahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.