​सुखी वैवाहिक जीवनासाठी द्या बेडरुमला ‘लाल रंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:59 IST2016-05-10T10:29:43+5:302016-05-10T15:59:43+5:30

ज्यांच्या बेडरुमला लाल, जांभळा आणि काळा रंग असतो ती जोडपी लैंगिकसुखाच्या बाबातील अधिक सक्रीय असतात.

Give a happy married life, bedroom 'red color' | ​सुखी वैवाहिक जीवनासाठी द्या बेडरुमला ‘लाल रंग’

​सुखी वैवाहिक जीवनासाठी द्या बेडरुमला ‘लाल रंग’

ग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये असे दिसून आले की, ज्यांच्या बेडरुमला लाल, जांभळा आणि काळा रंग असतो ती जोडपी लैंगिकसुखाच्या बाबातील अधिक सक्रीय असतात.

बेडरुमच्या रंगाचा तुमच्या ‘सेक्स लाईफ’वर कसा परिणाम होतो याचा उलगडा करणारे हे संशोधन आहे. बेडरुमध्ये फिके  रंग असतील तर सेक्स लाईफ भडक रंगाच्या बेडरुमपेक्षा कमी अ‍ॅक्टिव्ह असते.

लाल रंगाच्या बेडरुममध्ये राहणारे कपल्स महिन्यातून सरासरी दहा वेळा, काळा रंग असेलेले नऊ वेळा तर जांभळ्या रंगाची बेडरुम असलेले जोडपे आठ वेळा शारीरिकसुखाच आनंद घेतात.

लैंगिक तज्ज्ञांच्या मतानुसार आपल्या अवतीभोवतीचे वातावरण जर रोमॅण्टिक असेल, जोडप्यांच्या उत्साह अधिक वाढतो. म्हणून तर हनीमुनला गेले असताना लक्झरी हॉटेलच्या वातावरणात कपल्समध्ये ‘इंटिमसी’ जास्त असते.

बेडरुममध्ये गडद हिरवा रंगाला सवार्धिक नापसंती मिळाली. डार्क ग्रीन रंगामुळे प्रेमोत्तेजक भावना निर्माण होत नसल्याचे यावेळी आढळले. याचा अर्थ की, प्रेमाचा रंग लाल!

Web Title: Give a happy married life, bedroom 'red color'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.