यंग लुकसाठी ग्वेनेथला मधमाशांचा डंख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 15:38 IST2016-04-07T22:38:52+5:302016-04-07T15:38:52+5:30
हॉलीवुड अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो सध्या यंग लुकसाठी मधमाशांना शरण गेली आहे. ऐसशोबिज डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार ग्वेनेथ (४३) सध्या तारुण्यपणाचा लुक मिळविण्यासाठी उपचार करीत असून, त्यामध्ये मधमाशांचा डंख मारण्याची देखील एक पद्धत आहे.

यंग लुकसाठी ग्वेनेथला मधमाशांचा डंख
ह लीवुड अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो सध्या यंग लुकसाठी मधमाशांना शरण गेली आहे. ऐसशोबिज डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार ग्वेनेथ (४३) सध्या तारुण्यपणाचा लुक मिळविण्यासाठी उपचार करीत असून, त्यामध्ये मधमाशांचा डंख मारण्याची देखील एक पद्धत आहे. यावेळी ग्वेनेथ सांगितले की, उपचार पद्धतीनुसार मी मधमाशांचा डंख मारून घेतला आहे. ही उपचार पद्धती हजारो वर्षांपासून केली जाते. त्वचेवरील डाग, सुज काढण्यासाठी ही उपचार पद्धती अतिशय फायदेशीर आहे. या पद्धतीत वेदना प्रचंड होत असतात. मात्र ही पद्धत प्रभावी असून, तारुण्यपण जपण्यासाठी फायदेशीर असल्याचे तिने सांगितले.