इटलीमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:30 IST2016-05-12T14:00:36+5:302016-05-12T19:30:36+5:30
विश्वास मत घेऊन इटलीच्या संसदेने समलैंगिक विवाहांना मान्यता दिली आहे.

इटलीमध्ये समलैंगिक विवाहांना मान्यता मिळणार
ग ल्यावर्षी अमेरिकेने समलैंगिक विवाहांना मान्यता दिल्यानंतर आता जगातील इतर देशदेखील अशा प्रकारचा निर्णय घेण्याबाबत सकारात्मक विचार करत आहेत.
त्यामध्ये आता इटलीचा देखील समावेश झाला आहे. विश्वास मत घेऊन इटलीच्या संसदेने समलैंगिक विवाहांना मान्यता दिली असून लवकरच त्यासंबंधी कायदा पारित केला जाणार आहे.
या निर्णयानंतर रोममधील ऐतिहासिक वास्तू - कोलोजियम, ट्रेव्ही फाऊंटेन - सप्तरंगी रंगात प्रकाशित करण्यात आले. ‘एलजीबीटी’ समुदयाने इटलीच्या या निर्णयाचे स्वागत केले. विश्वासमतामध्ये 369-193 असे बहुमत मिळाले होते.
पंतप्रधान मॅटिओ रेन्झी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर संदेश लिहिला की, हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंद साजरा करण्याचा आहे. आपले अस्तित्व मान्य करण्याचे आणि समाजाने स्वीकृती दिल्याचे हे सेलिब्रेशन आहे. समलैंगिक असल्यामुळे लपून राहणाºया, समाजाने झिडकारलेल्या सर्वांना या निर्णयामुळे आधार आणि विश्वास मिळेल.