निराधारांसाठी जॉर्जचे अन्नदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 09:07 IST2016-01-16T01:09:30+5:302016-02-05T09:07:21+5:30

हॉलिवूडचा सुपरस्टार जॉर्ज क्लूनी समाजकार्यात नेहमीच आघाडीवर असतो...

George's Announcement for the Assassins | निराधारांसाठी जॉर्जचे अन्नदान

निराधारांसाठी जॉर्जचे अन्नदान

लिवूडचा सुपरस्टार जॉर्ज क्लूनी समाजकार्यात नेहमीच आघाडीवर असतो. येत्या ख्रिसमसपासून त्याने निराधारांसाठी पोटभर अन्न देण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कॉटलंड एडिनबर्ग येथे गेल्या महिन्यात जॉर्ज गेला होता. तेथील 'सोशल बाईट' या सेवाभावी संस्थेतर्फे त्याने सँडविच शॉपमध्ये निराधारांना पोटभर खाऊ घातले होते. त्याबाबत 'डेली मिरर'मध्ये खूप काही छापून आले होते. येत्या ख्रिसमसपासून ही मोहीम मोठय़ा प्रमाणावर सुरू होईल. तुम्ही फक्त आम्हाला ५ पौंड द्या, असे आवाहन त्याने गतवर्षी दानशूरांना केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ८00 जणांकडून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती; प्रत्यक्षात तब्बल ३६ हजार देणगीदार पुढे आले. त्यामुळे स्कॉटलंडमधील निराधारांना वर्षभर पोटभर अन्न देता येईल, असे जॉर्जने सांगितले.

Web Title: George's Announcement for the Assassins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.