स्मरणशक्ती वाढविण्याचे चार उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 07:01 IST2016-01-16T01:15:46+5:302016-02-12T07:01:42+5:30

सतत नवीन शिकण्याची जिज्ञासा जागृत ठेवणे फार गरजेचे असते आणि शिकलेले समजून घेण्यासाठी ते स्मरणात ठेव...

Four ways to increase memory | स्मरणशक्ती वाढविण्याचे चार उपाय

स्मरणशक्ती वाढविण्याचे चार उपाय

त नवीन शिकण्याची जिज्ञासा जागृत ठेवणे फार गरजेचे असते आणि शिकलेले समजून घेण्यासाठी ते स्मरणात ठेवावे लागते. चांगली स्मरणशक्तीमुळे तुम्ही फार लवकर आणि चांगल्याप्रकारे शिकू शकता. त्यामुळे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी पुढील उपाय करून बघाच गोष्टी आठवण्यावर जोर द्या : मेंदूवर थोडा जोर दिल्यावर तुम्ही नक्कीच एखादी जूनी गोष्ट आठवू शकता. ती जशीच्यातशी आठवण्याची गरज नाही. केवळ पुसटशी हिंट जरी मिळाली तरी पुरेसे आहे. असे केल्याने स्मरणशक्ती बळकट होण्यास मदत मिळते.
२. नवीन गोष्टींश्ी सांगड घाला : जर तुम्ही काही तरी नवीन शिकत असाल तर पूर्वी माहीत असलेल्या गोष्टींशी त्याची सांगड घाला. परस्पर संबंध जोडल्यामुळे नवीन माहिती समजून घेण्यास मदत मिळेल आणि चांगल्या प्रकारे समजून-उमजुन केलेली गोष्ट विसरत नाही.
३. स्वत:हून उत्तरे शोधा : एखादी गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर कोणाकडे मदत मागण्या आधी स्वत:च ती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आत्मनिर्भर होऊन शिकलेली गोष्ट विसरणे फार कठीण असते.

Web Title: Four ways to increase memory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.